Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

नागाव समुद्र किनारा हा उरण तालुक्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2026 | 01:59 PM
पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Follow Us
Follow Us:
  • नागाव समुद्र किनारा येथे प्रकाशयोजनेचा अभाव असल्याने सायंकाळनंतर अंधारात पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
  • स्वच्छतागृह, अंघोळीची सुविधा आणि कपडे बदलण्याच्या जागेचा अभाव असल्याने विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.
  • वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन यंत्रणा नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उरण: उरण तालुक्यातील निसर्गरम्य आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा नागाव समुद्र किनारा सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आला आहे. दररोज तसेच विशेषतः शनिवार-रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असताना, आवश्यक सोयीसुविधा नसल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Kajat News : नेरळ-कळंब रस्त्याचा वाद विकोपाला ; अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा

नागाव किनाऱ्याची स्वच्छ वाळू, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि शांत वातावरण यामुळे हा किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. तालुक्यातील तसेच बाहेरील भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येतात. किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी बंदर विभागाने उभारलेला धूपरोधक बंधारा हा किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरला असून, त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत येथे आवश्यक सुविधा विकसित करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

पर्यटकांची वाढती संख्या; सर्वांगीण विकास अत्यंत गरजेचा

संध्याकाळनंतर किनाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरते. हायमास दिवे बसवले असले तरी ते बहुतांश वेळा बंद असल्याने पर्यटकांना मार्ग शोधताना अडचणी येतात. विशेषतः कुटुंबासह येणा-या पर्यटकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. तसेच, समुद्रात भिजल्यानंतर अंघोळीसाठी स्वच्छ पाण्याची सोय नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. स्वच्छतागृहांची कमतरता, तसेच कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र जागेचा अभाव यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.

पर्यटनस्थळी या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पर्यटक व्यक्त करत आहेत. याशिवाय, शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतानाही सागर सुरक्षा रक्षकासाठी कायमस्वरूपी छावणी किंवा नियंत्रण कक्ष उपलब्ध नाही. संभाव्य अपधात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नागाव समुद्र किनाऱ्याचा सर्वांगीण विकास करणे अत्यंत गरजेचे आहे.

Karjat News : पळसदरीत भीषणअग्नीतांडव; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक तपास

नागाव समुद्र किनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम पर्याय असल्याने आम्ही येथे नेहमीच येत असतो. मात्र येथील सूर्यास्तंनंतरचा अंधार अपघाताला कारण ठरणारा आहे. तर स्वच्छतागृहाभावी महिला आणि जेष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने या सुविधा देणे गरजेचे आहे.- रोहन ठाकूर, (पर्यटक, पनवेल)

उरणचा समुद्र किनारा उत्तम आहे. इथे आल्यावर मुलांना समुद्राच्या पाण्याचा आनंद घेता येतो. मात्र येथे कपडे बदलण्याची आणि स्वच्छ पाण्यात अंघोळ करण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. सुरक्षा रक्षकांचा देखील आभाव असल्याने, पर्यटकांवर कोणतेच अंकुश राहात नाही, ज्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होऊशकते.- सुनील भोसले, (पर्यटक, उलवे)

Web Title: Nagaon beach faces tourist rush but lacks basic facilities safety and infrastructure concerns rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Beach
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.