Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

Neral News: कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्र असतानाही गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारींनंतर आता पाण्यातून साप वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पाणी शुद्धीकरण आणि वितरण व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 11:28 AM
नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

Follow Us
Follow Us:
  • नेरळकरांच्या आरोग्याशी खेळ?
  • गढूळ पाण्यानंतर आता नळातून आला साप
  • नेरळ ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
Neral News: कर्जत तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये प्रशासक राजवट पहिल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहे. जलशुद्धीकरण केंद्र असलेली नळपाणी योजना असून देखील गढूळ आणि दूषित पाणी येण्याचे प्रकार थांबत नाहीत. त्यात आता पाण्यात साप वाहून आल्याने नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Neral News)

नेरळ ग्रामपंचायत ही मध्य रेल्वेने जोडलेले जंक्शन स्थानक वरील गाव आहे. यामुळे गेल्या 30 वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून नेरळ गाव आता शहरीकरण झाले आहे. त्यात नेरळ गावच्या काही अंतरावरून उल्हास नदी वाहत असून नेरळ गावात चांगली नळपाणी योजना राबवली जात आहेत. त्यामुळे नेरळ मधील स्वच्छ पाणी हीच नेरळ गावचे नागरीकरण वाढण्यास महत्वाची ठरली आहे.

Action Taken Against : कल्याण-कर्जत महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; काहींवर हातोडा, काहींना अभय? स्थानिकांचा सवाल

मात्र सध्या याच नेरळ गावात राबवली जाणारी नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी सर्वांसाठी चर्चेची ठरली आहे. नेरळ गावात सप्टेंबर महिन्यात आलेले गढूळ पाण्याने नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार स्पष्ट झाला होता. जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या या योजनेतून शुद्ध पाणी येते आणि त्यामुळे सर्व लोक आनंदाने राहण्यासाठी आले. आता याच नेरळ मध्ये आता गढूळ पाण्यानंतर चक्क नळाच्या पाण्यातून साप येऊ लागले आहेत.

नेरळ गावातील सम्राट नगर भागातील अशोक गोपीनाथ जाधव यांच्या घरी आज सकाळी नळाच्या पाण्यासोबत चक्क साप आला. जाधव यांच्या घरातील महिला या पाण्यात खेळत असलेला साप पाहून गडबडल्या. मात्र पाण्यात राहणारा हा साप जाधव यांच्या घरात देखील मस्त स्वच्छंदपणे पाण्यात फिरत होता. अशोक जाधव यांना आपल्या घरातील पाण्यात फिरत असलेला साप याचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला. या पाण्यात फिरणाऱ्या सापाची माहिती नेरळ ग्रामपंचायत कडे दिली असता नेरळ ग्रामपंचायतने तत्काळ आपल्या कार्यालयातील प्लंबर तेथे पाठवले आहेत.त्या भागात कुठे जलवाहिनी फुटलेली आहे काय? फुटलेल्या जलवाहिनीतून सापाने पाण्याच्या जलवाहिनी मध्ये प्रवेश केला आहे काय? याचा तपास सुरू केला आहे.

आपण जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करूनच पाठवत आहोत. त्या भागात कुठे पाइपलाइन लिकेज् असल्यास हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.परंतु स्थानिक रहिवाशी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धार्थ सदावर्ते यांनी संपर्क केल्यानंतर तत्काळ प्लंबर पाठवले आहेत, तपास करीत असून साप कसा पाण्यासोबत आला याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी दिली.

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Web Title: Neral gram panchayat water supply snake found contaminated water karjat raigad sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Karjat
  • neral
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
1

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
2

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
3

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
4

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.