Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: उरण नगरपरिषद वार्ड ७ मधील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

उरण नगरपरिषद वार्ड क्रमांक ७ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली असून अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2026 | 02:03 PM
Raigad News: उरण नगरपरिषद वार्ड ७ मधील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Raigad News: उरण नगरपरिषद वार्ड ७ मधील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Follow Us
Follow Us:
  • स्वच्छतागृह परिसरात कचरा, तुंबलेली गटारे आणि सांडपाण्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे.
  • मच्छरांची वाढ झाल्याने डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
  • निधीअभावाचे कारण देत दुरुस्तीचा ठराव नामंजूर; नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
उरण नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक ७ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी! नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी; लवकरच शहराची तहान भागणार

उरण शहरातील वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या वार्ड क्र. ७ मध्ये भाजी मार्केट, माशांचा बाजार, चिकन मटण दुकाने तसेच विविध किरकोळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. दररोज हजारो नागरिक या परिसरात ये-जा करत असतात. याशिवाय कोट गाव वसलेले असल्याने स्वच्छतागृहाची गरज आहे. येथे स्वच्छतागृह उभारले असले तरी त्याची नियमित स्वच्छता न केल्याने ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. स्वच्छतागृह परिसरात कचराकुंड्यांची दुरवस्था, पाण्याच्या टाक्यांची देखभाल नसणे तसेच सांडपाण्याचा निचरा न होणे या समस्या गंभीर बनल्या आहेत. गटारातील सांडपाणी साचून राहत असल्याने मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. याशिवाय हजारोंच्या येथे सार्वजनिक संख्येने उंदीर व घुशी परिसरात वावरताना दिसत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

‘निधीअभाव’ कारण देत विरोधकांकडून ठराव नामंजूर

दरम्यान, १७ एप्रिल रोजी झालेल्या उरण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या स्वच्छतागृहाच्या दुरुस्ती, गटार सफाई, सांडपाणी निचरा आणि औषध फवारणीसंदर्भात ठराव मांडण्यात आला होता, मात्र नगरपरिषदेच्या निधीअभावाचे कारण देत विरोधकांनी हा ठराव नामंजूर केला. या निर्णयामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी बाकावरील भाजप सदस्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडूनही या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे, औषध फवारणीसारख्या मूलभूत उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. तत्काळ उपाययोजना करून स्वच्छतागृह व परिसराची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

अनेक दुकानदार, मास विकत, ग्राहक, रिक्षाचालक यांचा वावर याठिकाणी असल्याने, या प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न या अनुषंगाने निर्माण होत आहे. यामुळे पुढील १५ दिवसांत येथील पारिस्थिती सुधारली नाही तर येथील कचरा नगरपरिषदेच्या कार्यालयात मी स्वतः नेऊन टाकेन. – नरेश रहाळकर, शिवसेना, उबाठा उपजिल्हाप्रमुख

एनए जमिनीची प्रक्रिया आता होणार आणखी सोपी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

अनेक तक्रारी केल्या, थातूरमातूर काम केले जाते. कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, नगरपरिषदेमध्ये दोन-चार वेळा गेलो. अधिकाऱ्यांशी बोललो. ते नाही म्हणत नाहीत, पण काहीच काम करत नाहीत. किमान नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्यासाठी स्वछता तरी हवी. आमच्याकडे येणारा ग्राहक अशा पारिस्थितीमध्ये स्वच्छतागृहाचा वापर करत नाही.- मनोज पाटील, दुकानदार

याठिकाणी कचरा, दुर्गंधी, तुंबालेली गटारे, अस्वच्छ स्वच्छतागृह अशा अनेक समस्या आहेत. यासाठी राजकारण बाजूला ठेऊन जनतेची कामे केली पाहिजेत. समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सभागृहात प्रस्ताव मांडत आहोत पण समोरच्या बाजूने त्याला विरोध होत आहे. सुविधा देणे गरजेचे आहे, मात्र हे विरोधी बाकावरील सदस्यांना देखील समजले पाहिजे. – तनिषा पाटील, नगरसेविका

Web Title: Poor sanitation in uran ward 7 raises health concerns residents slam civic neglect raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
2

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
3

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.