Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: 15 दिवसांनी अवघा अर्धा तास पाणी! न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा

पनवेल तालुक्यातील न्हावे गावात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनियमित पाणीपुरवठा, कथित पाणीचोरी आणि टँकरच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 01:57 PM
पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

Follow Us
Follow Us:
  • न्हावे गावात 14 ते 15 दिवसांनी केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
  • मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
  • परिस्थिती सुधारली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पनवेल: पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमार्फत तब्बल १४ ते १५ दिवसांनी केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामसुधारक मंडळ न्हावेचे माजी अध्यक्ष योगेश कुंडलिक पाटील यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून गावातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

kalyan News: कल्याणच्या वालधुनीत उभारणार भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल; सांस्कृतिक-धार्मिक विकासाला चालना

अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी सुरू ठेवल्याचा आरोप

वाढत्या महागाईच्या काळात पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल कुटुंबाचे मोठे हाल होत आहेत. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांनाही पाण्याच्या समस्येचा फटका बसत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गावातील मुख्य जलवाहिनीवर काही व्यक्तीनी अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी अशा बेकायदेशीर जोडण्यांवर कारवाई करून त्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र त्या पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकारामुळे अधिकृत ग्राहकांना मिळणा-या पाण्याचे प्रमाण घटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

न्हावे गावातील नागरिकांना तब्बल १४ ते १५ दिवसांनी केवळ अर्धा तास पाणी मिळत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- योगेश कुंडलिक पाटील, माजी अध्यक्ष, ग्रामसुधारक मंडळ न्हावे

मुंबई आधी कोळी बांधवांचीच; गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक, प्रशासनाला कडक निर्देश

सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवावे लागत आहे. त्यामुळे पाणी दूषित होण्याचा आणि संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय बनला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची, पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची तसेच जलवाहिन्याची तपासणी करून नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Severe water crisis hits nhave village residents warn of agitation over irregular supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • panvel
  • raigad

संबंधित बातम्या

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
1

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
2

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
3

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!
4

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.