Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली

रायगड जिल्ह्यातील पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुष्काळ, वाढते तापमान आणि घटलेली आवक यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 02:16 PM
Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली

Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली

Follow Us
Follow Us:
  • पनवेल बाजारात टोमॅटोचा दर 50 रुपयांच्या घरात पोहोचला असून अनेक भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत.
  • भेंडी, फरसबी, वांगी, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांचे दर 60 ते 80 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत.
  • दुष्काळ, तीव्र उष्णता आणि घटलेला पुरवठा यामुळे आगामी काळात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पनवेल: एकीकडे दुष्काळाच्या झळांनी राज्य होरपळत असतानाच कडक उन्हानेही आता डोके वर काढले आहे. याचा एकत्रित परिणाम भाज्यांच्या किमतीवर होताना दिसत असून भाज्या जून महिना सुरु होऊन सुद्धा भाव खाऊ लागल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून महाग झालेल्या बहुतेक भाज्यांचा ‘भाव’ अजूनही कायम आहे. टोमॅटोचे भाव कडाडले असून, त्याचा किलोचा भाव ५० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आवक घटल्यानेच भाज्यांचे भाव उतरत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या ! सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड काढून घ्याच; ‘या’ तारखेपासून कार्ड असेल बंधनकारक

घाऊक बाजारात आठ ते दहा रुपयांच्या दरात विकल्या जाणाऱ्या फ्लॉवर व कोबी या भाज्या प्रत्यक्षात स्वयंपाकघरात येईपर्यंत ४० ते ४५ रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. तर भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची या भाज्यांचेही दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पनवेलच्या मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आणि विशेषत: पालेभाज्यांची भरपूर आवक होती. त्यामुळे बाजारात भाज्यांची स्वस्ताई होती. परंतु उन्हाच्या झळांमध्ये अजून वाढ होऊ लागताच फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, भेंडी, वांगी अशा सर्वच भाज्यांचे घाऊक आणि किरकोळ दर दुपटीने वाढले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मागणीत वाढ, आवक कमी

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात तहान भागवणाऱ्या आणि शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची मागणी झपाट्याने वाढू लागते. सध्या पनवेल फळबाजारात मागणी-पुरवठा समतोल बदलताना दिसत असून, काही फळांचे दर स्थिर तर काही ठिकाणी तेजीत आहेत.

फळांची वाढती मागणी

तापमान वाढताच टरबूज, खरबूज, द्राक्षे, लिंबू, पपई आणि आंबा यांसारख्या फळांची मागणी सातत्याने वाढते, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या फळांना अधिक पसंती मिळत आहे. व्हिटॅमिन-समृद्ध फळांमुळे शहरी भागातही खरेदी वाढ झाली आहे. जूस सेंटर, हॉटेल आणि किरकोळ विक्रीत वाढ झाली आहे.

किलोमागे शंभरी गाठली

विशेष म्हणजे, किरकोळ बाजारात गवार, फरसबी, वाटाणा आणि घेवड्यासारख्या भाज्यांनी तर किलोमागे शंभरी गाठली आहे. उन्हाळा आणि दुष्काळ यामुळे ही दरवाढ झाल्याची कारणे दिली जात आहेत. आगामी काळात भाज्या आणखी महाग होतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.

एसटी वाचविण्यासाठी जनआंदोलनाची गरज; नेतृत्त्व प्रताप सरनाईक यांनीच करावे : श्रीरंग बरगे

पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून पनवेलला घाऊक पुरवठा होत असतो. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे साधारणपणे एप्रिल, मे महिन्यात भाज्यांचे दर वाढतात. यंदा मात्र मार्च महिन्याव्या सुरुवातीपासूनच दरवाढ झाल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ऋतुचक्राचा फटका भाज्याच्या उत्पादनाला बसत आहे, अशी माहिती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक व्यापारी राम पाटील यांनी दै. ‘नवराष्ट्र ‘ला दिली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vegetable prices surge in panvel market as supply drops amid heatwave and drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • panvel
  • raigad
  • Vegetable prices

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.