Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wildlife Warden : माणगावच्या शिरपेचा मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती

Wildlife Warden : माणगावचे वन्यजीव अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते शंतनु कुवेसकर यांची रायगड जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे माणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 11, 2026 | 07:40 PM
Wildlife Warden : माणगावच्या शिरपेचा मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती

Wildlife Warden : माणगावच्या शिरपेचा मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • पक्षीवैभव आणि जैवविविधतेचे अभ्यासक
  • विविध अधिवासातील वन्यजीवांचे सखोल अभ्यासक
  • डिजिटल माध्यमे वन्यजीव संवर्धनासाठी प्रभावी व्यासपीठ
 

रायगड जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेले माणगावचे वन्यजीव अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते शंतनु कुवेसकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत रायगड जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी (Wildlife Warden) नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या दीर्घकाळच्या वन्यजीव अभ्यास, जनजागृती, वन्यजीव बचावकार्य आणि निसर्ग संवर्धनाच्या कामाला या नियुक्तीमुळे अधिकृत स्वरूपाची नवी जबाबदारी आणि शासनाकडून ओळख मिळाली आहे. माणगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जंगल, डोंगररांगा, नद्या, खाडीक्षेत्र, समुद्रकिनारे आणि ग्रामीण परिसरातील जैवविविधतेचा सातत्याने अभ्यास करणाऱ्या कुवेसकर यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध वन्यजीव आणि पक्ष्यांच्या नोंदी रायगड जिल्ह्यात केल्या आहेत.

पक्षीवैभव आणि जैवविविधतेचे अभ्यासक

रायगड जिल्ह्यातील पक्षीवैभव आणि जैवविविधता संपूर्ण महाराष्ट्रासोबत भारतभर आणि जगभरात दृष्टीक्षेपात आणण्यात कुवेसकर यांच्या छायाचित्रणाचे आणि अभ्यासाचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. शालेय जीवनापासून पर्यावरण क्षेत्राशी जोडले गेलेल्या कुवेसकर यांनी रायगडमधील तरुण आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये निसर्ग व वन्यजीव संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.
निसर्ग छायाचित्रण, पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमंती, पर्यटन, माहितीपट आणि लेखन या माध्यमांतून त्यांनी रायगडची जैवविविधता जगासमोर आणली. माणगाव तालुक्यातील वन्यजीव बचावाच्या विविध घटनांमध्येही कुवेसकर यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. वन्यजीव कायद्या अंतर्गत सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या प्रजाती, मगर, अजरग, पिसोरी हरीण, खवले मांजर, वाघाटी सारख्या वन्यप्राणी आणि अनेक पक्षी प्रजातींच्या बचावकार्यात त्यांनी वनविभाग आणि स्थानिक नागरिकांसोबत काम केले आहे.

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

 

विविध अधिवासातील वन्यजीवांचे सखोल अभ्यासक

रायगडच्या किनारपट्टीपासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत विविध अधिवासांमध्ये आढळणाऱ्या अनेक वन्यजीवांचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण कुवेसकर यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. रायगडच्या काळ नदी परिसरातील पाणमांजरांच्या वर्तनाचा अभ्यास गेल्या एक दशकाहून अधिक काळ ते करत आहेत, रायगड जिल्ह्यातून महाधनेश पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाचा सखोल अभ्यास देखील गेल्या १५ वर्षांपासून ते करत आहेत.
रायगडमध्ये हिवाळी स्थलांतर करणारी हिमालय ग्रिफन गिधाडे, अनेक प्रकारच्या घुबड प्रजाती, शिकारी पक्षी, स्थलांतरित पक्षी, साप, फुलपाखरे आणि कीटक पतंगे यांच्या अनेक प्रजातींची प्रथम नोंद जिल्ह्याच्या विविध भागांतून कुवेसकर यांनी केली आहे.

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

डिजिटल माध्यमे वन्यजीव संवर्धनासाठी प्रभावी व्यासपीठ

वन्यजीव छायाचित्रण हे कुवेसकर यांच्या कार्याचे आणखी एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्यांच्या छायाचित्रांमधून रायगडच्या जंगलातील पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि विविध अधिवासांचे दर्शन घडते. ई-छायाचित्र प्रदर्शन तसेच रायगडमधील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या शेकडो छायाचित्रांसह पक्षी व निसर्ग संवर्धनविषयक लेख देखील प्रसिद्ध आहेत.

आज सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमे वन्यजीव संवर्धनासाठी प्रभावी व्यासपीठ ठरली आहेत. या माध्यमांचा वापर करून स्थानिक जैवविविधतेची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविणे आणि निसर्गाविषयी आस्था निर्माण करणे, ही काळाची गरज आहे असे शंतनु कुवेसकर नेहमी सांगतात.

रायगड जिल्ह्यातील निसर्ग पर्यटन घडवून आणणाऱ्या पथप्रदर्शकांपैकी (पायोनिर) एक म्हणून शंतनु कुवेसकर यांची ओळख आहे. रायगड जिल्ह्यात व्यावसायिक दृष्ट्या निसर्गसहली, वन्यजीव आणि पक्षीनिरीक्षण सफारी सारखे उपक्रम राबवून, देशभरातूनच नव्हे तर बाहेरील देशांतून देखील अनेक पर्यटकांना रायगड जिल्ह्यात बोलावून इथल्या निसर्गसंपत्तीची महती त्यांनी पटवून दिली आहे.

निसर्ग पर्यटन व्यवसायातूनदेखील वन्यजीवांचे संवर्धन आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण कसे शक्य आहे आणि होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रण मित्रांचे आयोजन ते करत असतात.

Web Title: Shantanu kuveskar appointed honorary wildlife warden raigad rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Forest Department
  • Mangaon
  • raigad

संबंधित बातम्या

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास
1

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
2

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
3

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
4

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.