Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पेण तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतींना सूचना फलक लावण्याचे आदेश

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पेण तालुक्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वरसई, जावळी आणि आष्टे येथील तीन पूल अतिधोकादायक घोषित करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 02:53 PM
Raigad News: पेण तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतींना सूचना फलक लावण्याचे आदेश

Raigad News: पेण तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतींना सूचना फलक लावण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • पेण तालुक्यातील वरसई, जावळी आणि आष्टे येथील तीन पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक घोषित करण्यात आले आहेत.
  • जावळी-वरसई पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून निधी मंजुरीची मागणी करण्यात आली आहे.
  • पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायतींना पुलांजवळ इशारा फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पेण: दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील बांधकाम विभाग पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करत असतो. जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील बांधकाम विभागाच्या ऑडिटमधून पेण पूर्व भागातील वरसई, जावळी आणि आष्टे या भागातील ३ पूल अतिधोकादायक म्हणून घोषित केले. तीनही पूल अतिधोकादायक जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायतींना पुलाच्या सुरुवातीस सूचना दर्शक फलक लावून अहवाल सादरच्या सूचना दिल्या आहेत.

Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…

पेण तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या २४ पुलांची धोकादायक म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर पेण पूर्व भागातील वरसई, जावळी आणि आष्टे या भागातील ३ पुलांची मात्र अतिधोकादायक म्हणून नोंद करण्यात आली असल्याने या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे. वरसई वाशिवली करंबेळी छत्तीशी ते कातकरी वाडी हा बाळगंगा नदीवरील पूल धोकादायक आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात जर का हा पूल कोसळला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जावळी वरसई या पुलाच्या दुरुस्तीस ३० लाखांचा खर्च

जावळी वरसई या बाळगंगा नदीवरील पूल देखील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ऑडिट नुसार धोकादायक ठरविण्यात आला असून या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पुलाच्या डागडुजीसाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च येणार असून कोयना पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर व्हावा, अशी विनंती केली आहे.

कोयना पुनर्वसन अंतर्गत निधी मंजुरीची मागणी

आष्टे छोटे मार्गावरील साकव देखील धोकादायक ठरविण्यात आला असून या सकवाला आणि जोड रस्त्याला रेलिंगचे काम करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. साधारणता ५ लाख रुपये खर्च आवश्यक आहे. याच पुलावर अनेक अपघात झाले. कोयना पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर व्हावा, अशी विनंती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवालात केली आहे.

‘गिरगावकरांना वीजपुरवठा समस्येबाबत दिलासा मिळेपर्यंत…’; Mangal Prbhat Lodha यांचा इशारा

या धोकादायक पुलांवर दुर्घटना होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींना पुलाच्या सुरुवातीस सूचनावजा फलक लावण्यास सांगितले. मात्र या पुलांची डागडुजी किंवा नव्याने पुनर्बाधणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवला आहे. – समीर पाटील, उपअभियंता, पेण

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Three bridges in pen declared highly dangerous ahead of monsoon repair funds sought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • pen news
  • raigad

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.