पलावा पुलावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने ! राजू पाटील यांचा आरोपावर राजेश मोरेंचे स्पष्टीकरण
कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा पूलावरुन आता चांगलेच राजकारण तापले आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी पलावा पूलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूलाच्या कामात कोणत्या त्रूटी आहेत? हे दाखवून दिले. पूलाचे काम पूर्ण नाही. ठेकेदाराने हा पूल संबंधीत प्रशासनाला अद्याप हँड ओव्हर केलेला नाही. तरी देखील स्थानिक आमदारांनी घाई घाईने हा पूल वाहतूकीसाठी खुला केला. या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केली पाहिजे, असे देखील त्यांनी विधान केले आहे. या पूलाच्या लागून असलेल्या दुसऱ्या पूलाची आलायमेंट चेंज करण्यात आली आहे. हे देखील त्यांनी दाखवून दिले.
दरम्यान हा पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरु केला आहे. विरोधकांनी काय बोलायचे हे त्यांनी ठरवावे. आम्ही विकासाच्या कामातून टिकेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.
चार वर्षापूर्वी एका पूलाचे काम सुरु केले. त्याचे काम पूर्ण होऊ देखील त्याचे उद्घाटन थांबविले होते. पलावा पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. चार वर्षापूर्वी या पूलाचे गर्डर लॉन्चिंग केले. तेव्हा फटाके फोडले होते. याचे उद्घाटन त्यांनी अशा प्रकारे केले नसते का ? भिती पोटी घाईने हा पूल वाहतूकीसाठी सुरु केला आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने याठीकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यांनी लवकरात लवकर या पूलाची डागडुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे.
पुलाच्या उद्घाटन करणाऱ्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचेने पोलिस उपायुक्तांकडे तक्रार करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. यावर मनसे नेते पाटील यांनी सांगितले की, पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसीकडे याची तक्रार करायला हवी. याच्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदारीची चाैकशी करण्यात यावी. तेव्हा या पूलाच्या कामातील काळंबेरं बाहेर येईल. पोलिस या प्रकरणात केवळ ठेकेदाराला नोटिस देतील त्यातून काही साध्य होणार नाही याकडे पाटील यानी लक्ष वेधले आहे.
आधी अवकाळी आता मुसळधार; आंबेगावच्या शेतकऱ्यांचे होतायेत हाल, ५ हजार १०० हेक्टरवरील भात लागवड धोक्यात
हा पूल झाला तो दुरुस्त होऊन सुरु होईल. याच पूलाची दुसरी मार्गीकेची अलायमेंट बदलली आहे. त्याठिकाणी काम सुरु आहे .तिथे काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल पाटील यांनी उपस्थीत करीत त्याला आयुक्त देखील जबाबदार असली असे भाष्य केले आहे. या पूलाच्या मार्गिकेसह दिवा पूलाचा, मेट्रोची अलायमेंटही चेंज करण्यात आली आहे. बडया बिल्डरांच्या हितासाठी ही अलायमेटं चेंज केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
मनसे नेते पाटील यांच्या टिकेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, पत्री पूल, माणकोली पूलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले. मात्र विकासाच्या मुद्यावर आम्ही पूढे जाणार. लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे. विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे.