Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजू शेट्टींनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 28, 2025 | 03:06 PM
राजू शेट्टींनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागामध्ये जमीनीतील माती खरडून निघाली आहे. त्यामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागामध्ये एका दिवसात जवळपास तिनशे मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.

गेल्या चार-पाच दिवसापासून राजू शेट्टी यांनी मराठवाडा, पश्चिम विदर्भातील अतिवृष्टी व पुरबाधित जिल्ह्याचा दौरा केला. विशेषता राज्यातील सर्वाधिक नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. या जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, उडीद, मका, मूग, फळबागा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याकडेला असणाऱ्या जमिनीमधील पिके पंचनामे करण्यासही शिल्लक राहिलेली नाहीत.

यावेळी शेट्टी यांच्यासोबत सतिश काकडे, पृथ्वीराज जाचक, अमरसिंह कदम, राजेंद्र पाटील अजित बोरकर, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयात निर्यातीचे बदलते धोरण

मुळातच खते, बि-बियाणे, किटकनाशके, तणनाशके, औषधे यांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने व मजूरी बरोबर महागाई प्रचंड वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे सातत्याने बदलते धोरण, गडगडलेले बाजारभाव यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे, असे निवेदनात शेट्टी यांनी म्हटले आहे.

आत्महत्येचे संकट गडद हाेईल

राज्यातील पुरग्रस्त व अतिवृष्टी भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाईची मदत न केल्यास शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाईल. राज्यातील शेतकरी आत्महत्येचे संकट आणखी गडद होईल, अशी भीती शेट्टी यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

Web Title: Raju shetty has met agriculture minister dattatreya bharane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • agriculture ministry
  • Agriculture News
  • CM Devedra Fadnavis
  • Dattatray Bharane

संबंधित बातम्या

Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण यात्रेला मोठा प्रतिसाद; वाहनांच्या ताफ्यामुळे चाकण परिसर भगवामय
1

Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण यात्रेला मोठा प्रतिसाद; वाहनांच्या ताफ्यामुळे चाकण परिसर भगवामय

राजधर्माचे पालन करा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा, दिल्लीतून…; काँग्रेसची सरकारकडे मागणी
2

राजधर्माचे पालन करा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा, दिल्लीतून…; काँग्रेसची सरकारकडे मागणी

जरांगे पाटलांच्या उपोषणापूर्वी दुर्दैवी घटना; मुंबईला जाताना मराठा आंदोलकाचा मृत्यू
3

जरांगे पाटलांच्या उपोषणापूर्वी दुर्दैवी घटना; मुंबईला जाताना मराठा आंदोलकाचा मृत्यू

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
4

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.