Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांसह दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 08:56 PM
डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवली शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण
  • वैद्यकीय कारणांचा दाखला देत न्यायालयात जामिनासाठी युक्तिवाद
  • सहआरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत; पुढील निर्णयाची प्रतीक्षा
 

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद

डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर रमेश म्हात्रे यांनी कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी संबंधित गुन्ह्यांपैकी एका प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून त्यात अनेक आरोपी असल्याचे सांगत जामीन देण्याची मागणी केली. तसेच म्हात्रे यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत, त्यांना एकच किडनी असल्याचा वैद्यकीय दाखलाही न्यायालयासमोर सादर करण्यात आला.

‘रामरक्षा वाचता येत नाही आणि आंदोलन करता’; रामरक्षा आंदोलनावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दुसरीकडे, सरकारी वकिलांनी जामीन दिल्यास आरोपी फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सहआरोपींच्या जामीनावर अद्याप निर्णय नाही

रमेश म्हात्रे यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींकडून अद्याप जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जामिनाबाबतचा निर्णय पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय घेणार आहे.

राहुल गांधींच्या TET पेपरफुटीवरील टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; ‘आधी आपल्या पक्षाकडे बघा’

डॉक्टरांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप

डोंबिवलीतील शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे.

या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली होती. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक करण्यात आली होती.

Web Title: Ramesh mhatre granted bail doctor assault case dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Doctors News
  • Mumbai News
  • Thane news

संबंधित बातम्या

Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर
1

Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने
2

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
3

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर
4

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.