File Photo : Ration Card
चंद्रपूर : नागरिकांना कमी दरात धान्य मिळावे, यासाठी शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दर महिन्याला शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करते. मात्र, आता 1 नोव्हेंबरपासून केवायसी न करणाऱ्या नागरिकांचे रेशन बंद होऊ शकते. त्यामुळे कार्डधारकांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
हेदेखील वाचा : पुण्यात ससून रुग्णालयामध्ये काळीमा फासणारा नवा कारनामा; संबंधित दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब आणि गरजू लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन मिळते. दरम्यान, आता केंद्र सरकारने कार्डधारकांसाठी नवा नियम लागू केला आहे. रेशनकार्डचे केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबरपासून रेशन बंद केले जाईल.
कमी दराच्या शिधावाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. आता सरकारने कार्डधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने आधीच प्रसिद्ध केली आहे. मात्र, मृतांची नावे काढली जातील.
रेशनकार्डवर मरण पावलेल्या अनेकांची नावे आहेत. त्यामुळे त्यांची नावे काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ज्यांची नावे शिधापत्रिकेत आहेत, त्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जवळच्या रेशन वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊ शकता. कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल.
हेदेखील वाचा : भाजपच्या गडाला सुरूंग लागणार; अश्विनी जगताप शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
आजही अनेक शिधापत्रिकाधारक आहेत, ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सर्व कार्डधारकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना रेशन मिळणे बंद होईल. अशा लोकांची नावेही शिधापत्रिकांवरून काढून टाकली जातील आणि ज्यांनी ई-केवायसी केले नसेल, त्यांची शिधापत्रिका रद्द केली जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही.