Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल ‘इतक्या’ जादा बसेसचे नियोजन

प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 05:51 PM
रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल 'इतक्या' जादा बसेसचे नियोजन

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल 'इतक्या' जादा बसेसचे नियोजन

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागताच पर्यटनासाठी आणि गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. प्रवाशांची ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी प्रवाशांनी ‘लालपरी’लाच पसंती द्यावी, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. सध्या रत्नागिरी विभागातील ९ आगारांमधून दररोज सुमारे ३० जादा बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. शाळांना पूर्णतः सुट्टी लागल्यानंतर ही गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असून, त्या प्रमाणात बसेसची संख्याही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आगारांमधून मुंबई आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या गाड्यांचे जाळे विणण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या प्रमुख शहरांचा समावेश आहे:

ऑनलाइन आरक्षणाला प्रतिसाद

यंदाही प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एसटीच्या विश्वासाला प्राधान्य दिले आहे. एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ७० टक्के जादा गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग पूर्ण झाले आहे. ऐनवेळी होणारी गर्दी, उष्णतेचा त्रास आणि जागेची अनुपलब्धता टाळण्यासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मोबाईल ॲपवरून आपले आरक्षण निश्चित करावे.” असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे

प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष कक्ष

रत्नागिरी विभागातील नऊही आगारांमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. महिलांना तिकीट दरात मिळणारी ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठांना मिळणारी सवलत यामुळे एसटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवाशांनी वेळेत बुकिंग करून सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

धार्मिक स्थळांसाठी विशेष गाड्या

अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर यांसारख्या तीर्थक्षेत्रांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मराठवाडा व विदर्भ संपर्क: मिरज, लातूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, अकोला, नंदुरबार, परभणी आणि बुलढाणा या लांब पल्ल्याच्या मार्गांवरही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Keeping in mind the rush of passengers ratnagiri st department has planned additional buses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Ratnagiri
  • st bus

संबंधित बातम्या

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा इशारा
1

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा इशारा

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
2

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड
3

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
4

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.