दापोली येथे सलून व जनरल स्टोअर जळून खाक; सुमारे आठ लाखांचं झालं नुकसान
दापोली तालुक्यातील एका सलूनला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालगड येथील रहिवाशी किरण दळवी यांच्या स्वमालकीच्या सलुनला व बाजूलाच असलेल्या जनरल स्टोरला गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास अचानक आग भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे आठ लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.किरण दळवी हे रात्री नेहमीप्रमाणे आपले सलून बंद करून घरी गेले असता,काही वेळातच गावातील एका व्यक्तीने किरण दळवी यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे किरण दळवी यांना सांगितले.सलून व जनरल स्टोर घरा जवळच असल्याने किरण दळवी यांनी लागलीच तिकडे धाव घेतली.मात्र तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते.ही घटना गावकऱ्यांना समजताच गावकरी मदतीसाठी धावले.गावातील काही गावकऱ्यांनी आपल्या गाडीतून लगेच टाकी भरून पाणी आणले. आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.मात्र आगीच्या भयंकर ज्वाला पुढे कुणाचेच काही चालले नाही.अखेर काही वेळातच संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झाली व होत्याचे नव्हते झाले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार,आशिष शेलार यांची घोषणा
सदर घटना कळताच दापोलीतून तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष मंगेश शिंदे,तालुका सचिव .शैलेश चव्हाण,तालुका खजिनदार प्रितम शिंदे,शहर अध्यक्ष योगेश दळवी,माजी अध्यक्ष महेंद्र चव्हाण पालगड येथे समाज बांधव व पालगड ग्रामस्थ आदी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन किरण दळवी व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.या दुर्घटनेमध्ये सलून चे तसेच लगत असलेल्या जनरल स्टोर चे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.काही दिवसांपूर्वीच किरण दळवी यांनी सलून व्यवसायासाठी लागणारे मटेरियल तसेच जनरल स्टोर चे सामान भरले होते.
या आगीमध्ये सलून खुर्च्या,आरसे,गिऱ्हाईक बसण्याचे आसन,इलेक्ट्रिक मशीन,वस्तरा,कैची,फणी,क्रीम व इतर सौंदर्यप्रसाधने,फ्रीज पंखे,वीज मीटर तसेच रोख रक्कम,काही महत्वाची कागदपत्रे अश्या अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत.ऐवढच नाही तर दुकानाच्या भिंतीवर बसविण्यात आलेल्या टाईल्स सुद्धा निखळून पडल्या. सिमेंट पत्रे जळून फुटले आहेत.किरण दळवी यांच्या कुटुंबात आई,पत्नी व दोन लहान मुले आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे किरण दळवी यांचा कुटुंबावर घाला आला आहे.त्यांचा रोजगारच पूर्णत: ठप्प झाला असल्याचं समोर आलं आहे.