हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये तब्बल बाराशे दिव्यांग नागरिकांची नोंदणी व तपासणी करण्यात आली आहे. राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मयुर मंगल कार्यालयात या दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये 39 प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी करून नोंदणी करण्यात आली आहे. यावेळी वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी या शिबिरामध्ये स्वतः उपस्थित राहून दिव्यांग बांधवांशी हितगुज केले.सामाजिक न्याय विभाग व शासनाच्या विविध योजनांमधून या दिव्यांगांना उपयोगी असणाऱ्या विविध साहित्यांचे मोफत वाटप येत्या काही दिवसांत केले जाणार आहे.
[read_also content=”काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांचं निधन https://www.navarashtra.com/india/senior-congress-leader-and-former-governor-k-sankaranarayanan-dies-nrdm-272814.html”]