मोर्शी : जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मोर्शीपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाची (Upper Wardha Dam) मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता १३ गेट ६० सेंटी मीटरने उघडण्यात आले. त्यामधून १२४१ दलघमी क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
सोमवार १५ ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधर पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. अप्पर वर्धा धरणात ७६६ दलघमी पाण्याचा येवा सुरू असल्याने धरणाची निर्धारित क्षमता पूर्णत्वास जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात (Discharge of water into river basin) सोडण्यात आला.
अप्पर वर्धा धरणाची तेराही गेट पुन्हा उघडण्यात आल्याची बातमी पसरताच हे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तूषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी अप्पर वर्धा धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे. मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) वाहत येणाऱ्या जाम नदी (Jam River) व माडू नदीला (Madu River) मोठ्या प्रमाणात पूर येऊन दोन्ही नद्या दुथळ्या भरून वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात गत दोन दिवसात प्रचंड वाढ झाली आहे.
अप्पर वर्धा धरणात (Upper Wardha Dam) विविध नद्यांचा येणारा येवा हा ७६६ दलघमी क्युसेक असून अप्पर वर्धा धरणाची निर्धारित क्षमता ३४२.५० मीटर एवढी ठेवण्यात आली असली तरी मात्र आजची स्थिती ३४१.९० अशी आहे. सध्या धरण ९१ टक्के भरले आहे. शंभर टक्के धरण भरायला केवळ ९ मीटर कमी आहे. मोर्शीच्या उपविभागीय अभियंता (Sub-Divisional Engineer of Morshi) मनाली नंदागवळी मोर्शीचे सहाय्यक अभियंता गजानन साने,सुयोग वानखडे या ठिकाणी तळ ठोकून असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. ३१ जुलै अखेर जलाशयाची पातळी ३४१.१८ निर्धारित केली आहे. ही निर्धारित लेव्हल जुलै महिन्यातच पूर्ण करण्यात आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाची तेराही दारे ६ वेळा उघडण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे.