मुंबई– पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उदया (गुरुवार, १९ जानेवारी) रोजी मुंबईत विविध विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिका, (BMC) मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) (MMRDA) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच मुंबई दौऱ्यावर असताना पंतप्रधान सुमारे ३८, ८०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तत्पूर्वी ते कर्नाटकात पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत.
मेट्रोचा कसा असणार मार्ग…
गुरुवारी मेट्रो-दोन अ आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो 7 वरील गुंदवली स्थानकावर होणार आहे. हे स्थानक मेट्रो 1 च्या पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाच्याजवळ आहे. हा मार्ग 350 किमीहून अधिक लांबीचे मेट्रो नेटवर्क उभं करण्याचं शासनाचं नियोजन आहे. मेट्रो 2 अ (दहिसर- डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 ( दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील गोरेगाव- गुंदवली हा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोनबंदी करण्यात आली आहे.
मुंबईकरांना दिलासा, गर्दी कमी होणार?
पण मुंबईकरांसाठी आता मेट्रोबाबत एक गुडन्यूज म्हणजे मेट्रोमुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक जलदगतीने होणार आहे. एमएमआरडीएच्या या मेट्रो नेटवर्कमुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगाने व सुखकर होणार आहे. मात्र मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या आत्तापर्यंत फक्त दोन मार्गिकाचं दाखल झाल्या आहेत. 19 जानेवारीपासून ही सेवा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळणार असून, गर्दी कमी होणार असल्याचं बोललं जात आहे.
मेट्रोची 2 अ अर्थात दुसरा टप्पा दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत असेल. अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम,खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर या ठिकाणी थांबा असेल. तर ‘मेट्रो 7’ चा मार्गावर 13 स्टेशनवर थांबा असणार आहे. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबेल.
एवढा आला आहे खर्च…
मेट्रोची 2 अ अर्थात दुसरा टप्पा दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत असेल यासाठी जवळपास 6410 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या मार्गाची लांबी 18.6 किलोमीटर इतकी असून या मार्गावर 17 स्थानकांवर थांबा असणार आहे. मेट्रो लाइन 7 हा अंधेरी ते दहिसरपर्यंत असणार आहे. हा मार्ग वेस्टर्न एक्सप्रेससह 16.5 किलोमीटरपर्यंत आहे. यासाठी 6208 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. मुंबई मेट्रो लाइन – 2 अ दहिसरला डीएन नगरशी जोडते तर लाइन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडते. दरम्यान मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी 14 मेट्रो मार्गिकांचे 337 किमी लांबीचे जाळे विस्तारले जात आहे. यात आता मेट्रो 2 अ आणि मेट्रो लाईन 7 चा समावेश झाला आहे.
ही आहेत वैशिष्टे…