Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रीनफिल्ड प्रोजेक्टच्या भूसंपादनाबाबत येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

सुरत ते हैदराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट हा जामखेड तालुक्यातून जात असून त्यात जामखेड तालुक्यातील एकूण 13 ते 14 गावांचा समावेश आहे. या ग्रीनफिल्ड प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी संपादित होत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून नान्नज, फक्राबाद व आरणगाव या 3 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2022 | 03:40 PM
ग्रीनफिल्ड प्रोजेक्टच्या भूसंपादनाबाबत येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन!
Follow Us
Close
Follow Us:

जामखेड : सुरत ते हैदराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट हा जामखेड तालुक्यातून जात असून त्यात जामखेड तालुक्यातील एकूण 13 ते 14 गावांचा समावेश आहे. या ग्रीनफिल्ड प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी संपादित होत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून नान्नज, फक्राबाद व आरणगाव या 3 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.

अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन भूसंपादनाच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच यावेळी शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटवण्यासाठी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या गटातून जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही पण असा एखादा मोठा प्रकल्प येत असेल तेव्हा अनेक एजंट शेतकऱ्यांकडून जमीन घेण्यासाठी फिरत असतात. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारा भूसंपादनाचा योग्य मोबदला हा शेतकऱ्यांऐवजी या एजंटला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा कोणी एजंटने घेऊ नये म्हणून 13-14 गावातील शेतकऱ्यांना भेटून आमदार रोहित पवारांनी चर्चा केली. व गट निश्चित झाल्यानंतर जेव्हा सर्वे करण्यासाठी अधिकारी येतील त्यावेळी काय दक्षता घेतली पाहिजे व भूसंपादनावेळी काय काय अडचणी येऊ शकतात याची माहिती देऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळताना विलंब होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची यासाठी देखील आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

[read_also content=”मनसेतील अंर्तगत वाद पुन्हा चव्हाट्यावर; मनसे शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून वसंत मोरे याचं नाव वगळले https://www.navarashtra.com/maharashtra/mns-internal-disputes-resurface-vasant-mores-name-was-dropped-from-the-meeting-of-mns-city-office-bearers-nrdm-280321.html”]

रोहित पवार यांची प्रतिक्रिया? 

मतदारसंघात असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना सरकारकडून मोबदला हा विनामध्यस्ती मिळाला पाहिजे व कोणत्याही एजंटने शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे या हेतूने आम्ही सर्व बैठका घेतल्या आणि शेवटी सर्वस्वी निर्णय शेतकऱ्याचा असतो. पण याबद्दल माहिती शेतकऱ्यांना देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. असी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

Web Title: Rohit pawar along with officials guided the farmers to solve various problems related to land acquisition of greenfield project nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2022 | 03:39 PM

Topics:  

  • ahmednagar
  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
2

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.