Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द कराव्यात, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. विठ्ठलाच्या पावन भूमीतून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 06, 2026 | 05:46 PM
कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पंढरीत उपोषणास्त्र
  • विठ्ठलाच्या नगरीत कर्जमाफीचा हुंकार
  • रोहित पवार करणार बेमुदत आंदोलन
पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द कराव्यात, या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपुरात १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
विठ्ठलाच्या पावन भूमीतून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी हा लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या तीन-चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतीमालाला मिळणाऱ्या अपुऱ्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या कर्जमाफीची अपेक्षा असताना नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील अटींमुळे बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये पर्यावरणाला घातक प्रकल्प सहन करणार नाही; सयाजी शिंदेंचा थेट इशारा

छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह विविध महामानवांच्या प्रेरणेने विठुरायाच्या साक्षीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही संपूर्ण कर्जमाफी आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकारकडे आग्रही भूमिका मांडत आक्रमक पवित्रा घेतला असून त्यातच भर पडली असून”कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी” अशी भूमिका घेत रोहित पवार यांनी सरकारसमोर सात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्यातील कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, आंदोलनाला अवघा आठवडा शिल्लक असताना सरकार शेतकरीहिताचा सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारकडे शेतकऱ्यांच्या सात प्रमुख मागण्या

२०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी.
एकरकमी समझोता (ओटीएस) योजनेत सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा.
दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम आधी भरण्याची अट रद्द करावी.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी सलग दोन वर्षांच्या अटीशिवाय प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.
२०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा.
पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करून पुन्हा एक रुपयात पीकविमा योजना लागू करावी.
पेरणीपूर्वी आर्थिक अडचणी टाळण्यासाठी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.

Vakola BKC Flyover: वकोला-BKC प्रवास अवघ्या 5-10 मिनिटांत! 98% काम पूर्ण, फ्लायओव्हर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Web Title: Rohit pawar indefinite hunger strike pandharpur farmer loan waiver demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • rohit pawar

संबंधित बातम्या

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश
1

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा
2

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिसलेरीचा पुढाकार; महाराष्ट्र-गोव्यात ४० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
3

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिसलेरीचा पुढाकार; महाराष्ट्र-गोव्यात ४० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

CM Devendra Fadnavis NEET :’नीट’ यूजी पुनर्परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश? पहा एका क्लिकवर..
4

CM Devendra Fadnavis NEET :’नीट’ यूजी पुनर्परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश? पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.