मुंबई : शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केले. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी यांचे वंशज
मनोहर भिडे हे मनोहर कुलकर्णी नावाचा मनुष्य आहे. हे एवढे विचित्र बोलतायत, तरी त्यांना अटक का केली जात नाही? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या की मी माहिती घेतली, या व्यक्तीने नाव का बदलले. त्यानंतर मला असे सांगण्यात आले की, मनोहर कुलकर्णी हे अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी यांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी नाव बदलले.
देशातून बाहेर काढलं पाहिजे
दरम्यान, नाव बदलूनदेखील कृती काही बदलली नाही. हे आज महात्मा ज्योतिबा फुले, पंडितजी, महात्मा गांधीजींच्या आईबाबत, साईबाबा आणि भगवान श्रीकृष्णावर बोलले. तरी त्यांच्यावर थातूरमातूर गुन्हा दाखल केला. भिडेंना अटक झाली पाहिजे, तडीपार केलं पाहिजे एवढेच नाही, देशातून बाहेर काढलं पाहिजे, अशी मागणीही ठाकूर यांनी केली.
वक्तव्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी
यशोमती ठाकूर यांनी भिडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, तुमचा दाभोळकर करू, असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ठाकूर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Web Title: Sambhaji bhide is a descendant of afzal khana lawyer krishnaji so he changed boat congress yashomati thakur strong attack on bhideenwar nryb