पिंपरी : अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली (Marathi Movie) आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे तर शरद केळकर यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटावर आता विरोध होताना दिसत आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ‘हर हर महादेव’ या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक झाले आहे. यामुळं सर्वंत्र वातावरण तापलं आहे. या चित्रपटात ‘VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर, सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. असं अनेकांनी म्हटलं आहे.
[read_also content=”राहुल गांधींच्या सभेत शरद पवार उपस्थित राहणार, अशोक चव्हाण यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-will-attend-rahul-gandhi-meeting-information-by-ashok-chavan-342541.html”]
दरम्यान, आज खासदार संभाजीराजे यांच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून, पिंपरीत चालू शो बंद पाडण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत ‘हर हर महादेव’ हा चालू चित्रपट बंद करण्यास भाग पाडले. ब्राम्हण महासंघाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांना या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी देखील आक्षेप घेतला असून, इतिहासाची तोडफोड करुन हा सिनेमा तयार केला आहे, निर्मात्यांनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे होता, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हर हर महादेव या चित्रपटामध्ये दाखवलेली दृश्य चुकीची असल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटात सईराणी साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांनी एकेरी नावाने हाक मारली यावर देखील आक्षेप घेतला आहे. सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे चित्रपटात दाखवले आहे. यामुळं सिनेमावर आक्षेप घेतला असून, आज पिंपरीत चालू शो बंद पाडण्यात आला.