मुंबई : शिवसेनेच्या ३९ आमदारांच्या (Shivsena 39 MLA) बंडानंतर राज्यात संत्तातर झाले. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका सुरु केला आहे. दरम्यान मागील आठवड्यात बहुप्रतिक्षित औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osamanabad) शहराचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (State government meeting) त्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर (Sambhaji nagar) आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव (Dharashiv) करण्यात आले. सर्व मान्य झाल्यानंतर सर्च इंजिन गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती. त्यानुसार गुगलवर संभाजीनंगर व धाराशिव दिसत होते. मात्र आता ‘गुगल मॅप’ वरती संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, तर धाराशिवचे उस्मानाबाद ही नावे दिसत आहेत, त्यामुळं नेटकरी, शिवप्रेमी संतापले असून गुगलने घूमजाव का केले यावरुन गुगलला लाखोली वाहत आहेत.
[read_also content=”सीबीएसई इयत्ता १२ वी पाठोपाठ, इयत्ता १० वी चाही निकाल जाहीर, मुलींचीच बाजी https://www.navarashtra.com/maharashtra/cbse-class-12th-followed-by-class-10th-also-results-announced-girls-win-306911.html”]
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नामांतराला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी विरोध दर्शवत नामांतर विरोधात आंदोलन केले होते. तसेच त्यांनी यावर गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आज पुन्हा गुगलने आपल्या मॅपवर गुन्हा औरंगाबाद असे टाकले आहे. तर उस्मानाबादचे धाराशिव असं नाव दिसत आहे. गुगलने हे पाऊल नेमके का उचले होते, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळं शिवप्रेमी तसेच नेटकऱ्यामधून संतापाची लाट उसळत आहे.