Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : तासगावात गारपीटीचा तडाखा; बळीराजा हवालदिल, द्राक्ष, आंबा, मका पिकांचे मोठे नुकसान

तासगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसासह झालेल्या तीव गारपीटीने शेतीला मोठा फटका बसला असून द्राक्ष, आंबा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 06:10 PM
Sangali News : तासगावात गारपीटीचा तडाखा; बळीराजा हवालदिल, द्राक्ष, आंबा, मका पिकांचे मोठे नुकसान
Follow Us
Follow Us:
  • तासगावात गारपीटीचा तडाखा
  • बळीराजा हवालदिल, द्राक्ष, आंबा, मका पिकांचे मोठे नुकसान
सांगली : तासगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसासह झालेल्या तीव गारपीटीने शेतीला मोठा फटका बसला असून द्राक्ष, आंबा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उष्णतेपासून दिलासा देणारा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र संकट ठरला आहे. दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेल्या वातावरणातील बदलानंतर सायंकाळी साडेपाच वाजता तासगाव शहरासह बेंद्री, शिरगाव, निमणी, नागाव, कवठे, राजापूर, तुरची या भागांत जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

पडलेल्या गारपीटीचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना
तासगाव शहरात सुमारे दीड तास कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. तालुक्यातील सावळज, मनेराजुरी, विसापूर, मांजर्डे, कवठेएकंद, पेड़ था परिसरातही काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र नागाव-निमणी परिसरात सर्वाधिक गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी
या पावसामुळे उष्णतेत काहीसा गारवा निर्माण झाला असला, तरी गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. कृषी व महसूल विभागाने त्वरीत पाहणी करून मदतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून तासगाव तालुक्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गारपीटीच्या नव्या संकटाने बागायतदार शेतकरी आला अक्षरश: मेटाकुटीला
मका पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर उत्पादनात घट, वाढलेले खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना आता गारपिटीच्या नव्या संकटाने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.

Kolhapur News : पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर ; दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल

Web Title: Sangali newssangali news hailstorm hits tasgaon baliraja havaldil grape mango maize crops suffer major damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.