सांगोला (तालुका प्रतिनिधी)-सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक व तीन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांची चिकमहुद, खवासपूर, सावे, वाढेगाव या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर मंगेवाडी, चिणके, मेडशिंगी या ग्रामपंचायतीच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती 6 नोव्हेंबर रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दिनांक 16 नोव्हेंबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करणे तर 23 ऑक्टोबर रोजी सदर अर्जाची छाननी होणार असून बुधवार 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. रविवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवार 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Web Title: Sangola village has four gram panchayats universal responsibility while three gram panchayats are responsible for by elections nrab