Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वसमावेशक असा निर्णय काढणं गरजेचं, संजय राऊतांनी सरकारला चांगलचं सुनावलं

सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच आले होते. जो बायडेनसोबत केलेला करार प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 12, 2023 | 03:10 PM
आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वसमावेशक असा निर्णय काढणं गरजेचं, संजय राऊतांनी सरकारला चांगलचं सुनावलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन अद्याप थांबवण्यात आलेलं नाही. त्यातच मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. तर काही दिवसांत मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, समिती खुप झाल्या आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राण पणाला लावून उपोषण करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडत चालले आहे. जे केंद्र सरकार विशेष अधिवेशन घेत आहे त्यात हा विषय आला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

सरकारला मराठवाड्यातील कैबिनेट आधी हे सगळं गुंडाळायचं. लोकांनी विरोध करू नये, यांच्या गाड्या फोडू नयेत, रस्त्यावर उतरू नये यासाठीच हे सारं सुरूय कालच्या बैठकीचा कुणाला काही पडलेलं नाही, त्यातून काहीच साध्य झालं नाही केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनात हा विषय आला पाहिजे अशी टिका संजय राऊतांनी सरकारवर केली आहे. जी -२० आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहीतरी मिळवून देण्याचं अमिष दाखवलं गेलं, म्हणून ते आले. सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच आले होते. जो बायडेनसोबत केलेला करार प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता. सौदीच्या राजकुमारासोबत केलेला बारसूचा करारही त्याचाच एक भाग आहे अशी टीका संजय राऊतांनी सरकारवर केली.

पुढे ते म्हणाले. माजी लष्कर प्रमुखांनी असं बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी लडाख ची जमीन चीन ने बळकावली आहे ती ताब्यात घ्या. आधी लडाख, अरूणाचल इथला विवादीत भाग भारतात आणा. इंडिया आलायन्स मध्ये कोणताही मतभेद नाही असे संजय राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay raut eknath shinde maharashtra government aurangabad manoj jarange patil politics maharashtra jalna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 03:10 PM

Topics:  

  • aurangabad
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • political party
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
4

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.