Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

भाजपने मुंबईची फाळणी केली आहे. एक परप्रांतीय उत्तर भारतीयांची मुंबई आणि दुसरी मराठी माणसाची मुंबई, अशी फाळणी केली आहे. पण आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एकच आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 27, 2025 | 12:08 PM
Sanjay Raut PC, BMC Election 2025, BJP, Eknath Shinde Shivsena,

Sanjay Raut PC, BMC Election 2025, BJP, Eknath Shinde Shivsena,

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा- संजय राऊत
  • मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्या त्या आमच्या सिटींग जागा
  • उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारक मुंबईत येणार
Sanjay Raut News: “यंदाच्या निवडणुकीत ठाण्याचं महत्व वेगळं आहे. भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे, त्यादृष्टीने भाजपने तयारीही सुरू केली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीचे निकाल वेगळे होते. ती गणिते वेगळी होती. पण आता मात्र भाजप आणि शिवसेना-मनसे यांच्यात लढाई होणार आहे.” असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सत्ता गेली तरीही तासगाव नगरपालिकेत लागला आर. आर. आबांचा फोटो

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाण्यात स्वबळावर लढण्याचा मनसुबा आबेत. त्यासाठी ठाण्यातील कापूरवाडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बॅनर लावून प्रचाराला सुरुवात केला आहे. त्यावर, कमळाच्या चिन्हासह नमो भारत नमो ठाणे असा उल्लेख असलेले बॅनर्सही लावले आहेत. भाजपलाच यावेळी ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

त्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कसून तयारी सुरू केली आहे. जागावाटप आणि उमेदवारीच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यालाही सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, युती असूनही काही जागांवर उमेदवारीबाबत ताणतणाव आणि चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.

शरद पवार यांच्याशी युती

मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्या जागा आम्ही त्यांना देऊ शकलो. यात खरतंर शिवसेनेचं नुकसान झालं आहे, पण युती किंवा आघाडीत असे होत असते. ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्या त्या आमच्या सिटींग जागा आहेत. तिथे आमचेही लोक नाराज झालेत. आमच्या लोकांचीही संधी गेली. आघाडी आणि युती एका विशिष्ट हेतूने झालेल्या आहेत, भविष्यात सत्ता येईल तेव्हा अनेक पदे उपलब्ध होतील, तेव्हा त्या नाराज कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल.

Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड

भाजप सत्तेत आल्यापासून प्रत्येक निवडणुकीत बंडाळ्या वाढत चालल्या आहेत. भाजपकडूनच त्याला प्रोत्साहन मिळत आहे. पूर्वी निवडणुकीत मोजकेच पक्ष होते पण आता अनेक पक्ष झाले आहेत. त्यामुळे पर्याय उपलब्ध होत आहेत. मग त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात. त्यातून बंडाळ्यांना उत्तेजन दिले जाते.

उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारक मुंबईत येणार

भाजपकडून उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांना आणले जाणार आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपने मुंबईची फाळणी केली आहे. एक परप्रांतीय उत्तर भारतीयांची मुंबई आणि दुसरी मराठी माणसाची मुंबई, अशी फाळणी केली आहे. पण आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एकच आहे. जे मुंबईकर आहेत, त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं, पण भाजपने केवळ प्रांतवाद, जातवाद आणि धर्मावादाच्या आधारावर निवडणुका लढल्या आता मुंबईतही ते तेच करत आहेत. तुम्हाला आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, किंवा अन्य परप्रांतीय नेते मुंबईत कशासाठी पाहिजेत,असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

मुंबईचा मतदार मुंबईचा नागरिक आहे, तर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे, तुम्ही योगी आदित्यनाथ, रेखा गुप्ता, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणणार, म्हणजे, त्या त्या प्रांतातील लोकांना आणून त्या भागातील मतदारांना आकर्षित करणार, मग तुम्ही काय करताय, जिंकण्याची गोष्ट करताय, मग तुम्ही जिंकून दाखवा ना, असा टोलाही त्यांनी लगावला

 

Web Title: Sanjay raut made a sensational revelation claiming that the bjp wants to defeat eknath shinde in thane and that they have started working towards that goal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Elections 2025
  • Eknath shinde Shivsena
  • sanjay raut

संबंधित बातम्या

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब
1

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब

Maharashtra Politics : शिंदेंची नाराजी की फडणवीसांची खेळी; गणेश नाईकांना  प्रभारी पदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय ?
2

Maharashtra Politics : शिंदेंची नाराजी की फडणवीसांची खेळी; गणेश नाईकांना प्रभारी पदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय ?

राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू
3

राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू

इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल
4

इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.