
Satara District Central Cooperative Bank Election
उपस्थित राहणाऱ्या उमेदवार किंवा अधिकृत सूचकाने सोबत फोटो ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी मतदारसंघनिहाय करण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघाची छाननी सुरू असेल, त्यावेळी केवळ त्या मतदारसंघातील संबंधित उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत सूचक यांनाच सभागृहात उपस्थित राहता येणार आहे.
दरम्यान, दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांबाबत कोणाला हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात आणि संबंधित पुराव्यांसह सादर करावी लागणार आहे. केवळ तोंडी किंवा पुराव्याशिवाय केलेल्या हरकतींची दखल घेतली जाणार नसून, पुराव्यानिशी प्राप्त झालेल्या हरकतींवर नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी संबंधित उमेदवार व त्यांच्या सूचकांनी छाननीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर