Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

Satara Hill Half Marathon 2026: सांगलीच्या प्रवीण कांबळेने १५व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद पटकावत २१ किमी अंतर सुमारे १ तास ५ मिनिटांत पूर्ण केले, तर महिलांमध्ये राणी सदाशिव उत्तंडेने बाजी मारली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 06, 2026 | 07:27 PM
Satara Hill Half Marathon 2026

Satara Hill Half Marathon 2026

Follow Us
Follow Us:
  • यवतेश्वरच्या घाटात दमछाक
  • परतीच्या वेगात प्रवीण कांबळे सरस
  • महिलांमध्ये राणी उत्तंडेची बाजी
सातारा: यवतेश्वरच्या खडतर चढणीची परीक्षा, उतारावरील वेगाची कसोटी आणि अखेरच्या टप्प्यात प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी लागणारा दमसास या सगळ्यांवर मात करत सांगलीच्या प्रवीण कांबळे याने पंधराव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. सुमारे १ तास ५ मिनिटांत २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करत प्रवीणने शर्यतीवर आपली मोहोर उमटवली. महिलांच्या गटात सांगली जिल्ह्यातील राणी सदाशिव उत्तंडे हिने सुमारे १ तास ३० मिनिटांची वेळ नोंदवत अव्वल स्थान मिळविले.

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला

पुनीत बालन पुरस्कृत सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेला रविवारी सकाळी साडेसहा वाजता पोलीस कवायत मैदानावरून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला. स्पर्धेच्या पंधराव्या वर्षानिमित्त यंदा देश-विदेशातील धावपटूंसह तब्बल दहा हजार धावपटूंनी सहभाग घेतला. या विक्रमी सहभागाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी संयोजकांकडून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीला संयम; परतीच्या टप्प्यात प्रवीणचा वेग

प्रवीण कांबळेने शर्यतीच्या सुरुवातीपासून आक्रमक वेग न घेता परिस्थितीचा अंदाज घेत गती कायम ठेवली. यवतेश्वरच्या चढणीवर ताकद राखून ठेवलेल्या प्रवीणने माघारीच्या टप्प्यात वेग वाढवला. प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेली आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम ठेवली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोल्हापूर विद्यापीठाचा पदवीधर असलेला प्रवीण सध्या पोलीस भरतीची तयारी करत आहे. सातारा हिल मॅरेथॉनमधील या यशामुळे त्याच्या धावण्याच्या कारकिर्दीलाही नवी दिशा मिळाली आहे.

पहिल्याच सहभागात राणीची विजयी धाव

महिलांच्या गटात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोलगरे येथील राणी सदाशिव उत्तंडे हिने पहिल्याच सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये अव्वल कामगिरी केली. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे साडेपाच किलोमीटरच्या निर्णायक टप्प्यात राणीने वेग वाढवत आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. राणी ही कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजची विद्यार्थिनी असून, विद्यापीठ स्तरावरील चीनमधील मॅरेथॉन स्पर्धेत पाचव्या क्रमांकाची कामगिरी तिच्या नावावर आहे. विविध राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या राणीचा सध्या पुणे-बालेवाडी येथे सराव सुरू आहे.

यवतेश्वर घाटाने घेतली धावपटूंची परीक्षा

पोलीस कवायत मैदानापासून पवई नाका, शिवतीर्थ, शाहू चौक, बोगदा आणि यवतेश्वर घाटमार्गे प्रकृती हिल रिसॉर्ट असा पहिला टप्पा पार केल्यानंतर धावपटूंना त्याच मार्गाने परतीचा प्रवास करायचा होता. चढणीचा घाट, त्यानंतरचा उतार आणि अंतिम टप्प्यातील वेगाची लढत यामुळे २१ किलोमीटरची ही शर्यत धावपटूंसाठी खऱ्या अर्थाने कसोटीची ठरली.

दुतर्फा टाळ्यांनी सातारकरांचा उत्साह

पहाटेच्या गार वातावरणात सुरू झालेल्या शर्यतीदरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर सातारकरांनी गर्दी केली होती. टाळ्यांचा कडकडाट, घोषणांनी दिलेले प्रोत्साहन आणि विविध ठिकाणी उभारण्यात आलेले हेल्पिंग पॉइंट यामुळे धावपटूंचा उत्साह वाढला. पावर हाऊस परिसरातही नागरिकांनी धावपटूंचे जोशपूर्ण स्वागत केले.

पैठणीतील सुनिधी ठरली आकर्षण

हडपसर येथील सुनिधी गायकवाड हिने पारंपरिक पैठणी परिधान करून मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत उपस्थितांचे लक्ष वेधले. हडपसरच्या ब्ल्यू नेचर ग्रुपचे सुमारे ५० धावपटूही स्पर्धेत सहभागी झाले. विविध वयोगटातील महिला-पुरुष धावपटूंनी सहभाग नोंदवत फिटनेसचा संदेश दिला.

‘पीस अँड हार्मनी’चा संदेश

यंदाच्या स्पर्धेचे घोषवाक्य ‘पीस अँड हार्मनी’ ठेवण्यात आले होते. त्यानुसार पोलीस कवायत मैदानावर शांतता आणि सलोख्याचा संदेश देणारी प्रतिकात्मक चित्रे उभारण्यात आली होती.

धावपटूंच्या मदतीसाठी क्यूआर कोड

धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी एझार कंपनीच्या माध्यमातून विशेष क्यूआर कोड विकसित करण्यात आला. कोड स्कॅन केल्यानंतर धावपटूचे लोकेशन तसेच जवळच्या पिकिंग पॉइंटला संदेश पोहोचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, मुंबई येथील ६४ वर्षीय धावपटूला शर्यत पूर्ण करताना नगरपालिका कार्यालयाजवळ अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बोगदा परिसरात वाहतूक वळवली

मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, सातारा नगरपालिका आणि महसूल विभागाने आवश्यक नियोजन केले होते. २१ किलोमीटरच्या मार्गावर विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. बोगदा परिसरातील वाहतूक काही काळ पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. सातारा रनर्स असोसिएशनचे डॉ. संदीप काटे, शैलेश ढवळीकर, डॉ. प्रतापराव गोळे तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. दहा हजार धावपटूंच्या सहभागाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे संयोजकांनी सांगितले.

निकाल

पुरुष गटात

प्रवीण कांबळे – सांगली
वेळ : सुमारे १ तास ५ मिनिटे
अंतर : २१ किलोमीटर

महिला गटात

राणी सदाशिव उत्तंडे – सांगली
वेळ : सुमारे १ तास ३० मिनिटे
अंतर : २१ किलोमीटर

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

Web Title: Satara hill half marathon 2026 pravin kamble rani uttande won

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Marathon
  • Satara
  • Sports News

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
3

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
4

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.