एसटी बस (फोटो- सोशल मीडिया)
चालक, वाहकांवर कारवाईचे आदेश तक्रारीची सोय
सोलापूर विभागातून सर्वाधिक ५२ तक्रारी झाल्या प्राप्त
अन्यथा पर्यवेक्षकांना निलंबित केले जाणार…
गुहागर: महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) साध्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमधून शालेय विद्यार्थी प्रवास करू शकणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हात करूनही गाडी न थांबल्यास विद्यार्थी १८००२२१२५१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतील. तक्रारीची खात्री करून संबंधित चालक, वाहक व आगारप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे. परिवहन महामंडळाने १५ दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी खास हेल्पलाइन उपलब्ध करून दिली होती.
सोलापूर विभागातून सर्वाधिक ५२ तक्रारी झाल्या प्राप्त
त्यावर राज्यभरातून ३३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ५२ तक्रारी सोलापूर विभागातून प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये वेळेवर बस येत नाही, हात केला तर बस थांबत नाहीत, सांगितले जाते, अशा त्या तक्रारी आहेत तसेच शालेय पास असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो, अशाही तक्रारी आहेत. या तक्रारीची गंभीर दखल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.
मध्यम व लांब पल्ल्याच्या एसटीमधूनही प्रवास
तक्रारीच्या अनुषंगाने लवकर कार्यवाही तथा सुधारणा करावी अन्यथा शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांनाम निलंबित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांस्वठी साच्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या एसटीमधूनही प्रवास करता येतो.
अधिकृत थांब्याच्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर त्यांनी हात वर केल्यावर चालकांनी गाडी थांबवावी. अशा सूचना संबंधित विभागाकडून कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत.
एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक
महामार्गावर रातराणी धावणाऱ्या एसटीबसना अंधुक प्रकाशात मार्गक्रमण करावे लागत आहे. बसच्या पुढील हेडलाईटचा प्रकाशच जणू कंदिलासारखा अंधुक दिसत असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील जवळचा खड्डाही दिसत नाही. त्यामुळे बस आदळणे, एखाद्या अवघड वळणावरही हेडलाईटचा प्रकाश पोहचत नसल्याने समोर येणारे वाहन लगेच दिसत नाही.
Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा
त्यामुळे एसटी चालक हैराण झाले असून एसटीची प्रकाशवाटही बिकट झाल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. एसटीच्या बस रातराणी धावतात. विशेष करुन लांब पल्यावर मार्गक्रमण करत आहेत. या बसच्या पुढील हेडलाईटचा प्रकाश अंधुक असल्याने चालकाला वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागते. एकादा खड्डा समोर आला तरी तो लगेच या प्रकाशात दिसत नाही. बस रस्त्याच्या कडेला घेतानाही अवघड बनते.






