सांगोला – काय झाडी..काय डोंगार…काय हाटेल.. ओकेमध्ये हाय… या डायलॉगनं अख्या महाराष्ट्राला वेड लावणारे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या या डायलॉगनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. अनेक माध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. अनेक कार्यक्रमासाठी त्यांना बोलावणं आलं. त्यानंतर शिंदे गटातील ते प्रसिद्ध आमदार अशी त्यांची ओळख झाली आहे. दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण व धक्कादायक निर्णय घेतला आहे.
[read_also content=”कालच्या पत्रानंतर राज ठाकरेंचं आज दुसरं पत्र, पत्रात भाजपासाठी दिला ‘हा’ संदेश https://www.navarashtra.com/maharashtra/after-yesterday-letter-raj-thackeray-second-letter-written-to-devendra-fadnavis-and-bjp-337059.html”]
दरम्यान, सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील (Abhijeet patil) यांना आमदार करण्याची मागणी शहाजीबापूंनी केली. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. शहाजीबापूंच्या मागणीने खळबळ उडाली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहाजीबापू शिंदे गटातून आगामी निवडणूक लढणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी बोलत होते. दरम्यान, शहाजीबापू पाटलांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शहाजीबापूंनी ही मागणी थेट भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्याकडे केली. त्यामुळं शहाजीबापूच्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व भाजपा कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.