Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

Maharashtra News: शेवगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने जमिनीला भेगा पडत असून विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठाही कमी होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 30, 2026 | 03:16 PM
Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ९९ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी
  • पावसाअभावी सोयाबीन-कपाशीला फटका
  • विहिरी, तलाव कोरडे; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
 

पोपट पिटेकर, शेवगाव: शेवगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. जून अखेरपर्यंत पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. त्यामुळेच त्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर मात्र पावसाने बराच काळ पाठ फिरवल्याने शेतातील पिके अडचणीत आली आहेत. शेतामध्ये जमिनीला भेग्या पडू लागल्या, तसेच विहिर आणि तलाव देखील कोरडे पडू लागेल

शेतकऱ्यांची आशा मावळताना

तालुक्यात खरीप पिकांसाठी सुमारे ६५ हजार ११७ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. यापैंकी जवळपास ९९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद अशी विविध पिके शेतात उभी राहिली. सुरुवातीला पिकांची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम समाधानकारक जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने दडी मारल्याने ही आशा आता मावळताना दिसत आहे.

सरकारने तातडीने मदत करावी

सोयाबीनची पाने सुकू लागली असून कपाशीच्या वाढीवर देखील परिणाम दिसून लागला आहे. बाजरी आणि मक्याची पिके पाण्याअभावी वाकू लागली आहेत. तुरीसह चारा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. काही शेतांमध्ये पीक वाचवण्यासाठी पाणी देण्याची गरज आहे; पण त्यासाठी आवश्यक पाणीच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे.

शेतकरी गोवर्धन वाघमारे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीन, कपाशी आणि चारा पिकांची लागवड केली. बियाणे, खत, औषध, मशागत आणि मजुरीसाठी खर्च केल्यानंतर आता पिके वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पाऊस न झाल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे. Maharashtra News:

बाजारपेठेवरही परिणाम

महादेव गोलार यांची पाच एकर शेती आहे. त्यांच्या शेतात बाजरी, कपाशी, ऊस आणि चाऱ्याची पिके आहेत. मात्र पावसाअभावी चारा पिकेही संकटात आली आहेत. त्यामुळे शेतातील नुकसानाबरोबरच जनावरांना खाऊ घालायचे कसे, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा राहिला आहे. पिकांचे नुकसान झाले की त्याचा परिणाम थेट शेतकऱ्याच्या घरावर होतो. उत्पन्न घटते, कर्जाची चिंता वाढते आणि पुढील हंगामासाठी पैसे उभे करणे कठीण होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती केवळ शेतीपुरती मर्यादित नसून गावातील बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

१ सप्टेंबर रोजी आंदोलन

शेतकऱ्यांकडून आता केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदतीची मागणी होत आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनीही शासनाने परिस्थितीची दखल न घेतल्यास १ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

आज शेवगावच्या शेतकऱ्यांसाठी आभाळाकडे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पाऊस कधी येईल याची खात्री नाही आणि हातातील पीक दिवसेंदिवस सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न आता केवळ पावसाचा राहिलेला नसून शेती, जनावरे आणि कुटुंबाचा संसार कसा टिकवायचा, याचा झाला आहे.

Web Title: Shevgaon faces kharif crop crisis as rainfall deficit hits soybean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • farmer
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी
1

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
2

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर
3

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर
4

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.