Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे- फडणवीस सरकारचा गाफीलपणा महाराष्ट्राच्या मुळावर; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची टीका

वेदांता प्रकल्पाकरिता महाराष्ट्र राज्य प्रथम पसंतीचे होते. तसा सर्च रिपोर्टही होता. परंतु, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचा गाफीलपणा महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहे. मोदींचा ओढा गुजरातकडे असल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली, अशी टीका माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2022 | 01:46 PM
शिंदे- फडणवीस सरकारचा गाफीलपणा महाराष्ट्राच्या मुळावर; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची टीका
Follow Us
Follow Us:

कराड : वेदांता प्रकल्पाकरिता महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) प्रथम पसंतीचे होते. तसा सर्च रिपोर्टही होता. परंतु, राज्यातील शिंदे- फडणवीस (Shinde- Fadanvis) सरकारचा गाफीलपणा महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहे. मोदींचा (Narendra Modi) ओढा गुजरातकडे (Gujrat) असल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली, अशी टीका माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

बाळासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. वेदांता प्रकल्प हा त्यावेळचा विषय. या प्रकल्पासंदर्भातील सर्च रिपोर्टमध्ये सुद्धा या प्रकल्पासाठी महाराष्ट्रालाच पसंती होती. मोदींच्या गुजरात प्रेमापोठी हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता गुजरातला गेला. दुसर्‍या मोठ्या प्रकल्पाचे आश्वासन देवून सरकारची बोळवण केली आहे.

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. लंपी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. सरकारचा कारभार गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक आहे. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

[read_also content=”दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/three-accused-in-robbery-jailed-action-by-local-crime-branch-nrdm-326956.html”]

…तर आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य हेच त्याचे मतदार असतील असे वाटते. पण या सरकारने जर सर्व शेतकर्‍यांना याचे मतदार करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर ते बाजार समित्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. असे मतही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.

Web Title: Shinde fadnavis governments negligence at the root of maharashtra criticism of former minister balasaheb patil nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Gujrat
  • narendra modi

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.