मुंबई– आज छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, शिवजयंती साजरी होत असताना राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती देशभरात साजरी होत आहे. आज शिवजयंती देशासह जगभर साजरी होत आहे. परदेशात देखील शिवप्रेमींनी शिवजयंतीचे आयोजन केले आहे. त्यामुळं विदेशात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
दिल्लीत शिवजयंती साजरी
राजधानी नवी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह जोरात आहे. तर महाराष्ट्र सदनात होणार शिवजयंती साजरी होत आहे. दरम्यान, या ठिकाणी कोल्हापूर संस्थांनमधील शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. शिवजयंती निमित्त महाराष्ट्र सदनला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच राजधानी दिल्लीतील मराठी शिवप्रेमी उपस्थित राहणार असून, येथे शिवप्रेमीचा मोठा उत्साह आहे.
आग्र्याच्या किल्ल्यात गुंजणार महाराजांची शौर्यगाथा
उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ल्यावर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा गुंजणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे (shivaji maharaj and sambhaji maharaj) यांना ज्या किल्ल्यात औरंगजेबाने कैद केले होते त्या ठिकाणी आज प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे.
राज्यातून १० हजार शिवभक्त यूपीत दाखल…
दरम्यान, या कार्यक्रमसाठी राज्यातून १० हजार शिवभक्त गेले आहेत. परंतु किल्ल्यात फक्त ४०० शिवभक्तांना प्रवेश मिळणार आहे. यामुळे आग्रा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने मागितली होती. त्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून परवानगी मिळाली.