मुंबई : राज्यातील सरकार (State Government) बदलण्याची दाट शक्यता दिसत आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळं एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh koshayri) यांची भेट घेत मविआला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Superme Court) याचिका दाखल केली आहे. मात्र उद्या विशेष अधिवेशन बोलावले असून, मविआला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
[read_also content=”उद्या बहुमत चाचणी होणार का नाही हे समजेल, त्यानंतरच सरकारबाबत निर्णय होईल – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/jayant-patil-will-understand-why-the-majority-test-will-not-be-held-tomorrow-298762.html”]
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. त्यामुळं सरकार अडचणीत आले असून, सरकार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं उद्या बहुमत चाचणीसाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, हिंदुत्वाचा धागा पकडून या शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले आहे. तसेच त्यांना मविआ सरकार मान्य नाही म्हणजे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व कांग्रेस यांच्यासोबत सरकार नको आहे. तर भाजपासोबत सरकार स्थापन करा, असं या बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे. तसेच त्यांना शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंबदद्ल या बंडखोर आमदारांची तक्रार नाहीय. मात्र महाविकास आघाडी नको, सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व कांग्रेस नको. हिंदुत्वाच्या मुद्धावर मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे, तर आपण भाजपासोबत सरकार स्थापन करु असं या या बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे.
त्यामुळं हे बंडखोर आमदार उद्या मुंबईत आले तर, ते शिवेसेनेतच राहतील, व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करुन भाजपासोबत जुळवून घेऊ व सरकार भाजपासोबत स्थापन करु असं म्हणू शकतात. आणि असे जर झाले तर पुन्हा एकदा शिवसेना भाजपाची युती आपणास पाहयला मिळेल. व शिवसेना आपल्या जुन्या मित्राकडे वाटचाल करेल. यात शंका नाही. मात्र हे सर्व जर तर ठरेल. एवढे मात्र नक्की.