Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत, अशी अनेक पदं ओवाळून टाकू’; गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2023 | 06:59 PM
‘आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत, अशी अनेक पदं ओवाळून टाकू’; गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. या सर्व राजकीय घडामोडीनंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संसदीय गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

संसदीय गटनेते पदावरून खासदार राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्याऐवजी शिंदे समर्थक असलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे गटनेतेपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. कीर्तिकर हे नवे मुख्य नेते असतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, ‘आम्हालाही सांगण्यात आलं, कशाला राहताय? काय राहिलंय तिकडे? आमच्याकडे या…त्यावर मी म्हटलं थुंकतो तुमच्या ऑफरवर…बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी बेईमानी करणार नाही. अशी अनेक पद ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहोत. आम्ही जर खोके घेत, गुडघे टेकले असते, तर त्या पदावर राहिले असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्य नेतेपदी वर्णी लागताच सत्कार

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीतील निर्णयानुसार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी झाली. तर गजानन कीर्तिकर यांची या पदावर वर्णी लागली. शिवसेना खासदारांनी संसदेतील शिवसेना कार्यालयात गजानन कीर्तिकर यांचा सत्कार केला.

Web Title: Shivsena mp sanjay raut criticizes cm eknath shinde and their party nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2023 | 06:59 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Gajanan Kirtikar
  • maharashtra
  • political news
  • sanjay raut
  • Shinde group
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.