ठाण्यातील एका व्यवसायिकाला धक्कादायक अनुभव आला. केवळ त्याचा फोन हॅक झाल्याने या व्यवसायिकाला तब्बल 99.50 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना 7 ते 8 नोव्हेंबर दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी या व्यवसायिकाचा फोन हॅक केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, या व्यवसायिकाचा फोन हॅक झाल्यानंतर नेट बँकींगद्वारे त्याच्या खात्यातून लाखो रुपये हस्तांतरीत करण्यात आले. या सर्व व्यवहारांमध्ये मिळून एक कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले, वागळे इस्टेट पोलीस दप्तरी या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.