विनेश फोगाट (फोटो- सोशल मिडिया)
सुनावणीदरम्यान न्यायालयाने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर दिला असल्याचे समोर येत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि विविध मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी मानसिक दृष्ट्या शांत आणि तणावमुक्त असणे अत्यंत आवश्यक असते, असे न्यायमूर्तींनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. विनेश फोगाटने न्यायालयात बाजू मांडताना डब्ल्यूएफआयवर मनमानी आणि द्वेषपूर्ण कारवाई करत असल्याचा आरोप केल्याचे समजते आहे. महासंघाने ९ मे आणि १७ जून रोजी तिला जारी केलेल्या दोन्ही कारणे दाखवा नोटीस या देखील सूडबुद्धीच्या कारवाईचाच भाग असल्याचे याचिकेत असण्याचे म्हटले जात आहे.
Ans: भारतीय कुस्ती महासंघाला हायकोर्टाने उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाच्या कारवाईविरोधात याचिका दाखल केली आहे.






