Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : आदिवासी समाज आजही उपेक्षित; बालेघरमध्ये आदिवासींच्या हक्कांसाठी धरणे आंदोलन

बालेघर या आदिवासीबहुल गावातील नागरिकांच्या मूलभूत व घटनात्मक हक्कांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गावात शांततापूर्ण धरणे आंदोलनाचे करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 10:52 AM
Sit-in Protest for Caste Validity Certificates for the Tribal Community on Ambedkar Jayanti Satara News

Sit-in Protest for Caste Validity Certificates for the Tribal Community on Ambedkar Jayanti Satara News

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आंदोलन
  • बालेघर या आदिवासीबहुल गावात समाज उपेक्षित
  • संविधान वाचून धरणे आंदोलन
Satara News : वाई :  सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या बालेघर या आदिवासीबहुल गावातील नागरिकांच्या मूलभूत व घटनात्मक हक्कांसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. तृणाल टोणपे व अ‍ॅड. निकिता आनंद यांनी आवाज उठवला. आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी मंगळवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गावात शांततापूर्ण धरणे आंदोलनाचे करण्यात आले.

जातींचे दाखले मिळण्यासाठी कॅम्प घेऊन जात पडताळणी समितीचा ही कॅम्प घेऊन बऱ्याच वर्षाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन वाई प्रांतधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी सुशांत मोरे यांना दिल्याने आजचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. सदर आंदोलनास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले.

हे देखील वाचा : कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित

गावातील बहुतांश आदिवासी समाजाला आणि बऱ्याच नागरिकांना आजपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र , जात प्रमाणपत्र हे मिळालेले नाहीत. त्यामुळे बालेघर गावातील तरुण ग्रामपंचायत निवडणुकांकरिता अर्ज देखील दाखल करत नाही. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांमार्फत चालविला जात आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार बालेघर गावातील सुमारे ७५ टक्के लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे.

कायदेशीर तरतुदीनुसार सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असले तरी आदिवासी समाज यापासून वंचित आहे. यामुळे केवळ आदिवासी समाजच नव्हे तर गावातील इतर नागरिकांच्याही लोकशाही हक्कांवर परिणाम होत आहे. रस्ते, वीज, पाणी याबाबतचे काही प्रश्न सुटलेले आहेत परंतु काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.

हे देखील वाचा : अकोला ठरले जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर; तापमानाचा पारा 44 पार

या सर्व पार्श्वभूमीवर सुशांत मोरे यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊनही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनादरम्यान भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून नागरिक आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यात आली. सुशांत मोरे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, ‘जर वेळेत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच मूलभूत सुविधांबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर भविष्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येयील तसेच अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.’

वाई प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी सर्कल कोळेकर, ग्रामसेविका सुनीता राठोड, आंदोलनामध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, गावकरी देवेंद्र धुमाळ, गणेश सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, सतीश मोघे तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Sit in protest for caste validity certificates for the tribal community on ambedkar jayanti satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Andolan
  • Satara News
  • Tribal Community

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
3

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश
4

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.