नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre of Belapur Assembly Constituency) यांच्या प्रयत्नाने बेलापूर मतदारसंघातील झोपडपट्टी भागाचा विकास होणार आहे (Slum Areas Developement). आ. मंदा म्हात्रे यांनी झोपडपट्टी भागाचा विकास करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे १० कोटींची निधीची मागणी केली होती (Demands Funds). त्यासाठी वारंवार पाठपुरावा (Follow Up) केला होता.
ही मागणी शासनाने मान्य करत झोपडपट्टी भागात सुखसुविधा पुरवण्याकरिता रु. ४ कोटींच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली. मुख्यम्हणजे आ. मंदा म्हात्रे यांनी सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यात ही मागणी करून पाठपुरावा देखील केला होता. या निर्णयाचा फायदा बेलापूरलाच नाही संपूर्ण सह ठाणे जिल्ह्यातील (Thane District) विधनसभा मतदार संघाला देखील होणार असून त्यांना देखील हा निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे बेलापूर विधानसभा क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास याद्वारे करता येणार आहे.
[read_also content=”निवडणुकीच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरुर होईल, कसबा निकालावरून बदलाचे वारे सुरू: शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/election-results-decisions-will-definitely-be-considered-winds-of-change-are-starting-from-kasba-result-sharad-pawar-nrvb-373977.html”]
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच सतत शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. 4 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागासोबत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील झोपडपट्टी भागाचा देखील विकास साधता येणार असून या निधीचा वापर करून पालिकेला सुखसुविधा झोपडपट्टी भागात पुरवठा येणार आहेत. याआधीच आ. मंदा म्हात्रे यांनी स्मार्ट व्हिलेजसाठी सर्वत्र प्रथम १० कोटींचा निधी दिवाळे गावासाठी आणला आहे.
राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा / गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी गा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना शासन राबवत असते. या योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्य घटकांच्या वस्त्यांमधील कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
सीबीडी से-8 रमाबाई आंबेडकरनगर येथील नाल्याला संरक्षक भिंत व ब्रिज बांधणे- ५० लाख रूपये
4 सीबीडी से 8 रमाबाई आंबेडकरनगर येथे समाजमंदिर बांधणे- ५० लाख रुपये
सीबीडी से-8 रमाबाईनगर येथे उद्यान विकसित करणे – ५० लाख रुपये
नेरूळ शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्र उभारणे- ५० लाख रुपये
नेरूळ गांधीनगर येथे बालवाडी उभारणे- ५० लाख रुपये
नेरूळ गांधीनगर येथे समाजमंदिर उभारणे- ५० लाख रुपये
नेरूळ गांधीनगर येथे जलकुंभ उभारणे २५ लाख रुपये
तुर्भे हनुमाननगर येथे व्यायामशाळा उभारणे २५ लाख रुपये
तुर्भे इंदिरानगर येथे समाजमंदिर उभारणे ५० लाख रुपये