Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक; २ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. २ जुलै रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 06:46 PM
Smart Meter

Smart Meter

Follow Us
Follow Us:

महावितरणकडून घरगुती तसेच उद्योग-व्यावसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ २ जुलै रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, सरकारने स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने मागे घ्यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी ही माहिती दिली. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

राजकुमार पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील महावितरण कंपनीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांवर भविष्यात वाढीव वीजबिलांचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता असून, स्मार्ट मीटर धोरण हे सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा भांडवलदारांच्या हिताचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

सातारा विकासकामांना गती; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयाने काम करा, शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रशासनाला सूचना

सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांवर लादलेली स्मार्ट मीटरची सक्ती मागे घेतली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने जिल्हाभर विविध टप्प्यांत आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

महावितरणच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात पक्षाने रणशिंग फुंकले असून, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर (भाऊ) घाटगे यांनी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, सुवर्णताई पाटील, नितीन शिंदे, प्रवीण धसके, अर्चना देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Satara News : वाईतील भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो युवक-युवतींना जागेवरच नियुक्तीपत्रांचे वाटप

Web Title: Smart meter protest ncp sharad pawar satara july 2 morcha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?
2

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
3

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
4

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.