ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhhav thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी (Matohsree) रविवारी चार फूट लांब नाग (Snake Found At Matoshree) आढळला. दुपारच्या सुमारास बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यांनतर सर्वमित्राल बोलावण्यात आली आणि सापाला रेस्क्यू करण्यात आलं. सापाला रेस्क्यू करतानाच व्हिडिओ आता समोर आला आहे. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली.
[read_also content=”बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यांवर! क्रूर बापाने पोटच्या दोन मुलांना फेललं विहिरीत https://www.navarashtra.com/crime/man-threw-his-childrens-into-well-after-argument-with-wife-nrps-441731.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानातील पाण्याच्या टाकीमागे हा साप आढळून आला. ठाकरे कुटुंबीयांना ही बातमी समजताच त्यांनी तातडीने सर्पमित्राला बोलावले.
यानंतर साप पकडणारे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सापाला पकडले. त्यानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बंगल्यावर काम करताना काही कर्मचाऱ्यांना हा साप दिसला होता. हा साप कोब्रा जातीचा असल्याचं सर्पमित्राने सांगितल. साप पकडणार्याला आपत्कालीन कॉल करण्यात आला आणि सर्व सहभागींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आढळला कोब्रा जातीचा विषारी साप #Matoshree #Kobra #Viralvideo #म pic.twitter.com/HPAq7u04JL
— Harish Malusare (@harish_malusare) August 7, 2023