‘सोमेश्वर’चा भोंगा वाजला!; दुष्काळाच्या सावटात ६५ व्या गाळप हंगामास सुरुवात
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, बारामतीचेन नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ संचालक , प्रमोद काकडे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह नावनिर्वाचित संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजवर्धन शिंदे म्हणाले, की यंदाचा गाळप अत्यंत आव्हानात्मक आहे.
पाण्याची कमतरता असल्याने उसाचे सरासरी टनेज कमी बसणार आहे. जिरायती भागातील ऊसाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकी विभागाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यात समन्वय असायला हवा. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे मार्गदर्शन लाभेल.
सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने यंदाचा हंगाम यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर आणि संचालक प्रमोद काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कामगार युनियन आणि कामगार पतसंस्थेच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. गाळप हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी ऊसतोडणी, वाहतूक आणि गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन धनंजय खोमणे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री समुद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला संपूर्ण बहुमत मिळाले आहे. या संचालक मंडळाचा हा पहिलाच हंगाम आहे. मात्र पहिल्याच हंगामात खूप मोठे आव्हान आहे. तोडणीचे योग्य नियोजन करणे. सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे, उसाचे वेळेवर गाळप करणे या आव्हानांना नूतन संचालक मंडळाला सामोरे जावे लागणार आहे.






