यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ (फोटो- istockphoto)
लाखोंच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना जेवण मिळेना
पांढरकवडा येथील मुलांच्या वसतिगृहात गंभीर प्रकार उघडकीस
विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती
यवतमाळ: शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेच्या नावाखाली पांढरकवडा (Yavatmal)येथील मुलांच्या वसतिगृहात गंभीर दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. लाखोंच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना दररोज देण्यात येणाऱ्या दूध, अंडी आणि फळांचा पुरवठा थांबला असून, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि नियोजनाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे
पांढरकवडा येथील वस्तीगृहात ७५ मुलांना राहण्याची व्यवस्था आहे त्यापैकी ४२ मुले सध्या वस्तीगृहात आहे मात्र वस्तीगृहात तपासणीदरम्यान सकाळी १०:३० वाजेपर्यंत जेवण तयार होत नाही आणि मेनूनुसार जेवण दिले जात नसल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांकडून नोंदवलेल्या तक्रारींनुसार, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अपुरे जेवण मिळते. “अंडीच मिळत नाहीत, कंत्राटदार कोण आहे हे कळत नाही कंत्राटदाराला कोण गळ्यात घालतोय कळतच नाही दूध आणि फळे कुठे जातायत?” असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थी सुरक्षेसाठी आता एकच समिती! दोन समित्यांचे एकत्रीकरण; जिल्हाधिकारी असणार समितीचे अध्यक्ष
जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शासनाने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहे बांधली आणि भोजन पुरवठ्यासाठी लाखोचा कंत्राट दिली. मात्र, या वसतिगृहात ताळमेळाचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे. आवश्यक पदार्थांचा पुरवठा न होणे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मी पाच वर्षापासून होस्टेलमध्ये शिक्षण घेत आहे अनेकदा जेवणासंदर्भात ठेकेदाराची संवाद साधला मात्र काही प्रतिसाद मिळत नाही. ठेकेदारांना प्रश्न विचारला असता जेवणाचे पैसे आम्हाला कमी मिळतात, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे जेवण मिळते. आम्ही विद्यार्थ्यांनी जेवण चांगले मिळावे यासाठी अनेकदा आंदोलन सुद्धा केले. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील अनेक दिवसांपासून अंडी मिळत नाही. नॉनव्हेज जेवण्याचा दर्जा घसरलेला आहे. सध्या जेवणाचा सुद्धा दर्जा घसरलेला आहे. त्वरित कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र यासंदर्भात संबंधित एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी पांढरकवडा अमित रंजन यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी सखोल चौकशी करून संबंधित वर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
युवराज राजूरकर, विद्यार्थी पांढरकवडा वस्तीगृह
निश्चितच पांढरकवडा कळम राळेगाव येथील वस्तीगृहामध्ये जेवणाचा दर्जा खालावलेला आहे संबंधित कंत्राटदार हे मनमानी कारभार करतात या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे अशा कंत्रात दारावर निश्चितच मी संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलून कारवाई करण्याचे आश्वासन देतो.
उन्हाळा होईल सुखकर! हापूस आंब्यांपासून घरच्या घरी बनवा थंडगार मँगो मस्तानी, नोट करून घ्या रेसिपी
राजू तोडसाम, आमदार
मात्र शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचे सिद्ध होते. जिल्हा प्रशासनाने कडक निरीक्षण आणि चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.






