सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या निकालात यंदा ही मुलीने मारली बाजी मारली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज म्हणजेच १३ मे रोजी दुपारी १ वाजता SSC परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) सोमवारी याबाबत घोषणा केली होती. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग निहाय निकाल हाती आला आहे. पुणे विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे.
दहावीच्या परीक्षेला सोलापूर जिल्ह्यातून ६४ हजार४५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील ६३ हजार ८४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातील ५९ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ३४ हजार ७७३ विद्यार्थी परीक्षेला नोंदणी केले होते त्यातील ३४ हजार,४३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील ३१ हजार ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.४ टक्के इतके आहे. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेला २९ हजार ६८१ मुलींनी नोंदणी केली होती. त्यातील २९, हजार ४१७ मुलींनी परीक्षा दिली आणि त्यातील २८ हजार २७२मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के इतके आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल चांगला लागला आहे यामध्ये पुन्हा मुलीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. शास्त्र शाखेमध्ये ९० टक्केच्या पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भाषा विषयात मराठी, संस्कृत या विषयाचा निकाल चांगला लागला आहे. दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी मोठी यंत्रणा लावली होती. कॉपीमुक्त अभियान यामुळे हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास चांगली संधी मिळाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
क्लास न लावता सई सारोळे हिने मिळविले यश
सोलापूर इंडियन मॉडेल स्कूलमधील सई राजकुमार सारोळे हिने दहावीच्या परीक्षेत ९६.६० टक्के गुण घेऊन यश संपादन केले. इंडियन मॉडेल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात 90 टक्केच्यावर गुण असलेले 82 विद्यार्थी आहेत तर 90 टक्केच्या आसपास गुण असलेले 80 विद्यार्थी आहेत. हर्षदा कामती हिने 99.60 टक्के गुण घेवून स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सई सारोळे हिने क्लास न लावता यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, संचालिका सायली जोशी, प्राचार्य सुजाता बुट्टे, वर्गशिक्षक जेऊरे, शीरशीकर यांनी अभिनंदन केले आहे.