राज्यभरात सगळीकडे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कच्चे रस्ते, किंवा इतर काही कारणामुळे रस्ता मार्गावर नेहमीच अपघात घडत असतात. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. असाच एक भीषण अपघात वर्ध्यात घडला आहे. या अपघातामध्ये ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी महामंडळाची बस वर्ध्यामध्ये उलटली आहे. या अपघातानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. एसटी अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णावाहिका बोलावून उचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वर्धा जिल्ह्यातील धाडी शिवारामध्ये एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. धाडी शिवारात बस उलटी पडली. बस उलटी पडल्यानंतर बसमध्ये असलेले ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील पाच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झालेली बस वरुडहून तळेगावकडे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी धाडी शिवराजवळ आल्यानंतर बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये बस पूर्ण उलटी पडली. प्रवास करत असलेल्या एसटी बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. मात्र धाडी शिवराजवळ आल्यानंतर ही बस उलटी पडली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. तसेच तिथे असलेल्या स्थानिक नागरिकांना अपघातामध्ये जखमी झालेल्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घडल्यानंतर पोलिसांना लगेच सांगण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी आले. जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने अमरावतीच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातस्थळी स्थानिक नागरीक आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरु आहे.तर बसमध्ये जखमी झालेल्या ३१ प्रवाशांमधील ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.