देहूरोड : किवळे, मामुर्डी, साईनगर, विकासनगर या भागातील करदात्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचे किवळेगावातील कर भरणा केंद्रात पाणीपट्टी कर भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी जनसंवाद सभेत केली.
महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद सभेत किवळे परिसरातील करदात्या नागरिकांना पाणी कर भरण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीची माहिती तरस यांनी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीचे निवेदनही त्यांना देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंत्रपाळे उपस्थित होते.
सध्या किवळे, मामुर्डी, साईनगर, विकासनगर या भागातील करदात्या नागरिकांना पाणी कर भरणा करण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरील ब क्षेत्रीय कार्यालयात जावे लागत आहे. हे अंतर दूर असल्याने वेळ वाया जातो. त्यामुळे अनेक नागरिक पाणी कर भरणा करण्यासाठी तेथे जाण्यास टाळाटाळ करतात. किवळे गावातील मिळकत कर भरणा केंद्रात पाणी कर भरणा केंद्र सुरु केल्यास स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, याकडे तरस यांनी शहर अभियंता निकम यांचे लक्ष वेधले.
वरील विषयास अनुसरून मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे की वरील भागाची लोकसंख्या व वाढते शहरीकरण लक्षात घेता प्रत्येक घरामध्ये महानगरपालिकेचे अधिकृत नळ कनेक्शन असून त्याचा कर भरण्यासाठी ब प्रभाग ऑफिस चिंचवड या ठिकाणी जावे लागते हे ठिकाण वरील ठिकाणांपासून अंतर जास्त असल्याने नागरिक पाणीपट्टी कर भरण्यास टाळाटाळ करतात.
ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग कामगार वर्ग या सर्वांच्या अडचणींचा विचार करता आपण ही बाब लक्षात घेऊन तातडीने सोडवावी त्यामुळे मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे किवळे गाव मनपा कर संकलन केंद्र या ठिकाणी अधिकृत पाणीपट्टी भरणा केंद्र सुरू करावे अशी मी आपणाकडे नम्रतापूर्वक मागणी करतो