कल्याण: कल्याणमधल्या(Kalyan) एका विद्यार्थिनीने प्रामाणिकपणाचा आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे.रस्त्यावर पैशाने भरलेले पाकिट एका विद्यार्थिनीला सापडले. पाकिटातील (Pocket Full Of Money) पैशांचा मोह न बाळगता तिने ते आपल्या क्लासच्या संचालकाडे सोपवत ज्या कोणाचे ते असेल त्याला ते मिळावे हा प्रामाणिक हेतू मनात ठेवला. विशाखा पाटील असे (Vishakha Patil) या विद्यार्थिनीचे नाव आहे. विशाखाच्या आदर्श कृत्याबद्दल कोकण वसाहत परिसरातील माजी नगरसेवक संजय पाटील यांनी तिचा सत्कार केला.
[read_also content=”Video! लालू प्रसाद यादव यांची भावनिक पोस्ट; “आम्ही खूप वेळा भांडलो होतो, शरद भाई…” असा निरोप द्यावा लागेल असं वाटलं नव्हतं, व्हीडिओत म्हटलंय… https://www.navarashtra.com/india/video-lalu-prasad-yadav-emotional-post-we-had-fought-many-times-sharad-bhai-i-didnt-think-i-would-have-to-say-goodbye-the-video-says-361354.html”]
कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत परिसरात राहणारी शालेय विद्यार्थिनी विशाखा पाटीलला पैशाने भरलेले पाकिट सापडले. विशाखा पाटील हिने कोणताही मोह न बळगता तातडीने ते पैशाने भरलेले पाकिट दादा क्लासचे संचालक वैभव लिंगायत यांच्याकडे सोपविले.ज्या कोणाचे हे पाकिट असेल ते त्याला सोपवण्यास तिने सांगितले. वैभव लिंगायत यांनी तातडीने चौकशी करीत स्थानिक कार्यकर्ते गणेश कोते, वसंत खापरे यांना फोन करून पाकिट सापडल्याबाबत माहिती दिली. पुढे मग चौकशी अंती ते सापडलेले पाकिट कोकण वसाहतीतील एलआयजी टू मधील रहिवासी आनंद कालेकर यांचे असल्याचे सिद्ध झाले. वैभव लिंगायत यांनी विशाखाचे वडील अनिल पाटील यांच्यासह आपल्या प्रभागातील माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या कार्यालयात जात अनंत कालेकर यांना सर्वांच्या उपस्थितीत विशाखा व तिचे वडील यांच्या हस्ते हरविलेले पाकिट परत केले.
शालेय विद्यार्थिनी विशाखा पाटील हिच्या प्रामणिकपणाच्या कृत्याचे कौतुक बाळासाहेबांची शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले. माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या हस्ते विशाखाला शाल व गुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत कौतुक करून तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी गुरुनाथ परब ,वसंत खापरे यांनी देखील विशाखा पाटीलच्या चांगल्या कामाचं भरभरून कौतुक केले.
आजकाल विशाखासारखे प्रामाणिक लोक सापडणं अवघड झालं आहे. अनेकांना पैशांचा मोह आवरणे कठीण जाते. अशा परिस्थितीत विशाखासारखे लोक त्यांच्या कामामुळे वेगळे ठरतात.