रासायनिक लेपन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मूर्तीवर पांढरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली. हिंदू जनजागृती समितीने या रासायनिक प्रक्रियेला विरोध करूनही धर्मसंमत नसलेले हे रासायनिक लेपन भाविकांवर लादले गेले. मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्यापूर्वी मंदिरे समितीने ‘गतवेळच्या लेपनाचा अहवाल घोषित करावा, तसेच ज्यांनी हे लेपन केले त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही घनवट यांनी स्पष्ट केले आहे.
आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन् कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.