बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला (फोटो - सोशल मीडिया)
नागपूरमधील जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पीटल परिसरामध्ये भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बागेश्वर बाबा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या समोर धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले.
यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिले की, बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे. मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे. त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पक्षातील जबाबदाऱ्यांची विभागणी, पार्थ यांच्याकडे मुंबई-दिल्ली तर…
याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी संताप दावा केला. ते म्हणाले की, . महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं हे जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर शिवरायांचा अपमान झाला हो, असे म्हणत भाजप रस्त्यावर उतरली असती. छत्रपती शिवरायांना तुम्ही थकलेला माणूस म्हणतात, तुम्हाला कुठून हे सुचतंय, असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय नैतिकतेचा ऱ्हास; जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादांना प्राधान्य
काय केले वादग्रस्त विधान?
धीरेंद्र शास्त्री म्हणाले एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज थकले होते आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवत आपण थकलो असून आता राज्यकारभार सांभाळावा, अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी ती मान्य केल्याचे सांगितले.त्यांनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरु’ असे सांगत पुन्हा मुकुट शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.






