बीड : बीडमधील ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) आणि उपनेत्या सुषमा अंधारे ((Sushma Andhare ) यांच्यातील वादाने सध्या राज्याच्या राजकारणाचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकीकडे आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळुन लावला. ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रकरण तापतानाच आप्पासाहेब जाधव यांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि यावर सुषमा अंधारेनी काय स्पष्टीकरण दिलं जाणून घ्या.
आज बीडमध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल बिडमध्ये सायंकाळच्या सुमारास सुषमा अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव हे सभास्थळाची पाहणी करत होते. यावेळी यावेळी इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये भांडणं झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यानंतर आप्पासाहेब जाधवही यांनी अंधारे यांना चापट लगावल्याचा दावा केला होता. त्यानंतर सगळीकडे चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, या प्रकरणी कारवाई करतलगेच पक्षाने जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आप्पासाहेब यांच्या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी रात्रीच ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत एक फेसबुक लाईव्ह करत आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की, माझ्यावर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. पण मी सुखरुप आहे. मला मारहाण करण्यात आलेली नाही. पुढे त्या म्हणाल्या की, आम्ही गुरुवारी महाप्रबोधन यात्रा होत असलेल्या माने कॉम्प्लेक्स येथे सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत होते. त्यावेळी बाहेर आप्पासाहेब जाधवांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. एका माणसाला काहीतरी काम सांगत होते. ते त्याला काहीतरी सूचना देत होते. मात्र, त्यांची भाषा उर्मटपणाची आणि एकेरी होती. त्या माणसाला आप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुख असल्याचे माहिती नव्हते. त्याला आप्पासाहेब जाधव यांनी वापरलेली भाषा सहन झाली नाही. तो उलटून आप्पासाहेब जाधव यांना म्हणाला की, तू नीट बोल, मी काही कामगार नाही. त्यावर आप्पासाहेब जाधव यांचा संतापले. मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी नीट बोल, असे म्हणत आप्पासाहेब जाधव यांनी त्या व्यक्तीला म्हण्टलं. मात्र, तेव्हा उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर मध्यस्थी केली मात्र, . आप्पासाहेब जाधव त्यांच्यावरही संतापले. हे सगळे भांडण सुरु असल्याचे समजल्यानंतर मी इतर पदाधिकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आप्पासाहेब जाधव निघून गेले होते. यानंतर उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर संतापले. माझा मित्र शेड्युल कास्टचा आहे, मला पोलिसांमध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायची आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला. पण आपली सभा आहे, महाप्रबोधन यात्रा पार पडू दे, त्यानंतर शांतपणे या सगळ्याचा विचार करू, असे सांगत मी वरेकर यांनी समजूत काढल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.