Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या कथित बेकायदा हस्तांतरण प्रकरणाने नवे वळण घेतले असून, महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अप्पर तहसीलदारांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 04:54 PM
आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी जमीन हस्तांतरण प्रकरणात महसूल अधिकारी अडचणीत
  • सरनाईकांनी मागितली कठोर कारवाई
  • भाईंदरमधील आदिवासी जमीन गैरव्यवहार प्रकरण तापले
  • अप्पर तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी
विजय काते, भाईंदर : भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या कथित बेकायदा हस्तांतरण प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, या प्रकरणात महसूल विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आदिवासी जमिनींच्या व्यवहारांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असतानाच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अप्पर तहसीलदारांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महसूल मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

आदिवासी समाजाच्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी काही महिन्यांपासून समोर येत होत्या. अनेक आदिवासी नागरिकांनी आपल्या जमिनींचे फेरफार, मालकी हक्कातील बदल आणि बेकायदा हस्तांतरण झाल्याचा आरोप करत शासनाकडे दाद मागितली होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी समितीची नियुक्ती केली होती.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

समितीने केलेल्या चौकशीत महसूल अभिलेखांमध्ये त्रुटी, फेरफार प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन, तसेच महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. अहवालात काही व्यवहारांमध्ये आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता नोंदी करण्यात आल्याचे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घेतली नसल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या चौकशी अहवालात काही प्रकरणांमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचा उल्लेख असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढला आहे. मात्र, चौकशी अहवालात नावाचा उल्लेख असणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरते, असे नाही. अंतिम निष्कर्ष आणि पुढील कारवाई शासनाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महसूल मंत्र्यांना पत्र पाठवून संबंधित अप्पर तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. आदिवासी जमिनींच्या व्यवहारांमध्ये महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने निष्पक्ष चौकशी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून आदिवासी नागरिकांना न्याय मिळावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे महसूल विभागावर दबाव वाढला असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आदिवासी संघटनांनीही या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, गरज पडल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

राज्यात आदिवासी जमिनींच्या संरक्षणासाठी कठोर कायदे अस्तित्वात असतानाही अशा प्रकारचे कथित गैरव्यवहार घडत असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणातील चौकशी आणि शासनाच्या पुढील निर्णयावर अनेक आदिवासी कुटुंबांचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

“राजकारण बाजूला ठेवून माझ्या मतदारसंघातील आदिवासी नागरिकांची जर कोणीही फसवणूक करत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामध्ये जर महसूल विभागातील अधिकाऱ्यांची साथ असेल, तर त्यांचीही सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळेच संबंधित अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी मी महसूल मंत्र्यांकडे केली आहे. आदिवासी बांधवांना न्याय मिळेपर्यंत मी हा पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.” – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Aditya Thackeray on Sachin Ahir: कारवाई तर होणारच! सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा

Web Title: Bhayandar tribal land transfer case pratap sarnaik demands suspension of deputy tehsildar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
1

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘मैदानबंदी’? नव्या भाडे धोरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने
2

Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘मैदानबंदी’? नव्या भाडे धोरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित
3

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
4

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.